Summer Health Care esakal
लाइफस्टाइल

Summer Health Care : उन्हाळ्यात हृदयविकारासह होऊ शकतात विविध आजार, असा करा बचाव

Summer Health Care : उन्हाळ्यात शरीरामध्ये पाण्याची कमतरता असल्यास डिहायड्रेशनची समस्या वाढू शकते. यामुळे हृदयाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते

सकाळ वृत्तसेवा

Summer Health Care : राज्यात कडक उन्हाच्या झळा सुरू झाल्या आहेत. या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा आजारांचा धोका वाढू शकतो. उन्हाळ्यात शरीरामध्ये पाण्याची कमतरता असल्यास डिहायड्रेशनची समस्या वाढू शकते. यामुळे हृदयाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते; तसेच डिहायड्रेशनमुळे थकवाही जाणवतो. यामुळे कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घेऊया.

डोळ्यांचा संसर्ग

उन्हाळ्यात येणारी उष्णतेची लाट शरीरासह डोळ्याच्या आरोग्यासाठी चांगली नसते. यामुळे डोळ्यांचा संसर्ग वाढू शकतो. तीव्र सूर्यप्रकाशामुळेही डोळ्यांसंबंधित समस्या निर्माण होतात. यामुळे तुम्ही उन्हात बाहेर जात असाल, तर सनग्लास वापरावेत आणि डोळे थंड पाण्याने धुवावे.

टायफाइड

उन्हाळ्यात टायफाइड आजाराला लोक बळी पडू शकतात. मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. या आजारात ताप, डोकेदुखी, उलट्या, जुलाब आणि थकवा यांसारख्या समस्या जाणवतात. यामुळे उन्हाळ्यात आहाराची काळजी घ्यावी. आहारात हंगामी फळ आणि भाज्यांचा समावेश करावा. उन्हाळ्यात शिळे पदार्थ खाणे टाळावे.

अन्न विषबाधा

आरोग्यतज्ज्ञांच्या मते उन्हाळ्यात पोट बिघडणे, उलट्या आणि जुलाब यांसारखे आजार उद्‍भवू शकतात. कारण अन्नातून विषबाधा होते. उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते आणि त्यात बॅक्टेरिया वाढतात. यामुळे असे पदार्थ खाल्ल्यास विषबाधा होऊ शकते. त्यामुळे जास्त वेळ ठेवलेले अन्न खाऊ नका, रस्त्यावरील खाद्यपदार्थही टाळा.

पोटासंबंधित आजार

उन्हाळ्यात पोटासंबंधित आजार वाढू शकतात; कारण या दिवसांमध्ये अन्न आणि पाण्यातून बॅक्टेरिया पोटात जाऊ शकतात. यामुळे बद्धकोष्ठता, जुलाब यांसारखे आजार होऊ शकतात. यामुळे स्वच्छ पाणी आणि खाद्यपदार्थ खावेत.

उष्माघातापासून कसा बचाव करावा

  • उन्हाळ्यात पाण्याची कमतरता जाणवू देऊ नका.

  • दिवसभरात ६ ते ७ लिटर पाणी प्या.

  • उन्हात घराबाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी.

  • उन्हाळ्यात बाहेर जाताना स्कार्फ आणि सनग्लास वापरावा.

  • कलिंगड, खरबूज यांसारख्या हंगामी फळांचे सेवन करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd ODI Live : आकिब नबीने विश्वास सार्थ ठरवला... किवींना ११ धावांत २ धक्के; KL Rahul चा अविश्वसनीय झेल Video Viral

Bala Nandgaonkar: विकसकाच्या बाऊन्सर्सचा बंदोबस्त करा; बाळा नांदगावकर; पिंगुळी पाझर तलाव, सासोली जमीन घोटाळाप्रश्‍नी आक्रमक

Pune Markets: दिवाळीनिमित्त व्यापारी पेठा गजबजल्या ;नवीन खतावण्यांची खरेदी; विविध दुकानांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई

Latest Marathi News Live Update : शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज; सकाळी १० वाजता ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार

Amba Ghat Tunnel Project : आंबा घाटाला मिळणार बोगद्याचा पर्याय! कागल ते रत्नागिरी प्रवास आता अवघ्या एका तासात; प्रकल्प अहवाल तयार करण्याची मंत्री गडकरींकडून सूचना

SCROLL FOR NEXT