Vastu Tips
Vastu Tips Esakal
लाइफस्टाइल

Vastu Tips: झाडूसह या गोष्टी चुकूनही स्वयंपाकघरात ठेवू नका, नाहीतर अन्नपूर्णा देवीचा होऊ शकतो कोप..

सकाळ डिजिटल टीम

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराची मांडणी आखणी योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे. परंतु, धकाधकीच्या जिवनात आपण जाणूनबुजून किंवा नकळतपणे अनेक वेळा वास्तू नियमांकडे दुर्लक्ष करतो, त्याचा परिणाम येणाऱ्या पुढच्या काळात दिसून येतो. स्वयंपाकघर हे घरातील सर्वात महत्त्वाचे आणि मुख्य स्थान मानले जाते. अन्नपूर्णा देवी स्वयंपाकघरात  24 तास वास करते. तिच्याच कृपेने आणि आशिर्वादाने आपल्या स्वयंपाकघरात धन-धान्य भरलेले राहते. स्वयंपाकघरात कुटुंबातील सदस्याच्या पोटाची भुक भागवणारे अन्न तयार केले जाते.

म्हणूनच स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ निटनेटके ठेवायला हवे असं म्हटलं जातं. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे. परंतु, जाणूनबुजून किंवा नकळत आपण अनेक वेळा वास्तू नियमांकडे दुर्लक्ष करतो, त्याचा परिणाम येणाऱ्या काळात दिसून येतो. वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या स्वयंपाकघरात ठेवू नयेत. जाणून घेऊया किचनमध्ये कोणत्या वस्तू ठेवणे योग्य नाही.

पंडित इंद्रमणी घनश्याल यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वयंपाकघरात स्वच्छतेच्या वस्तू ठेवणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे झाडूसह स्वच्छतेच्या गोष्टी दूर ठेवाव्यात. स्वयंपाकघराची साफसफाई केल्यानंतर या वस्तू दुसऱ्या ठिकाणी ठेवाव्यात. असं म्हणतात की स्वयंपाकघरात झाडू ठेवल्याने घरात सदैव अन्नाची कमतरता भासते. या गोष्टींचा परिणाम घरातील सदस्यांच्या आरोग्यावरही होतो. अशा परिस्थितीत धन-धान्याची कमतरता भासू नये, यासाठी स्वच्छतेच्या या सर्व वस्तू स्वयंपाकघरापासून दूर ठेवाव्यात.

● वास्तू नियमानुसार आपली वैद्यकीय औषधे स्वयंपाकघरात ठेवू नयेत. यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य अजुन बिघडू शकते. असे मानले जाते की, स्वयंपाकघरात औषधे ठेवल्याने घरामध्ये रोग-राई वाढते. यामुळे घरात आपोआप नकारात्मक ऊर्जा अचानक वाढते.म्हणून चुकूनही स्वयंपाकघरात कोणतेही औषध ठेवू नये.

● वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरशाचा वापर कधीही करू नये. त्यामुळे जीवनातील अडचणी वाढतात. स्वयंपाकघरातील आरशामुळे अग्नीचे प्रतिबिंब तयार होते, असे म्हणतात. त्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा प्रसारित होते, जी अत्यंत हानिकारक ठरते.

● स्वयंपाकघरात चुकूनही देव्हाऱ्याची स्थापना करू नये. देव्हारा स्वयंपाकघरात ठेवल्याने देवतांचा कोप होतो. त्यामुळे त्यांची आपल्याला देवाचा आशिर्वाद मिळत नाही आणि त्याचा त्रास मग आयुष्यभर  सहन करावा लागू शकतो. 

● वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात जास्त शिळे अन्न ठेवू नये. यामुळे घरात गरिबी येते आणि आर्थिक नुकसानही होते.

●अनेक वेळा जुनी, गंज लागलेली भांडी, तुटलेल्या वस्तू स्वयंपाकघरात ठेवल्या जातात, असं करणं वास्तुशास्त्रानुसार अशुभ असते. तसेच जुन्या वस्तू, रद्दी इत्यादी स्वयंपाकघरात ठेवू नये. यामुळे देवी अन्नपूर्णा नाराज होऊ शकते.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.सकाळ त्याची कोणती शाश्वत हमी देत नाही.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT: सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली; सलग दुसरी घटना घडल्यानं खळबळ

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: अमेठी, रायबरेलीची जागा लवकरच जाहीर होणार; खर्गे घेणार पत्रकार परिषद

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

SCROLL FOR NEXT