Study Sakal
लाइफस्टाइल

Vastu Tips: तुमच्या मुलाचे अभ्यासात मन लागत नसेल तर हे वास्तू नियम पाळा!

एखाद्या  घरात जर का वास्तुदोष असला तर, त्यामुळे त्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या प्रगतीमध्ये असंख्य अडथळे येतात.

सकाळ डिजिटल टीम

एखाद्या  घरात जर का वास्तुदोष असला तर, त्यामुळे त्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या प्रगतीमध्ये असंख्य अडथळे येतात. दैनंदिन जीवनात देखील अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तूमध्ये एक अनोखी ऊर्जा असते. या ऊर्जेचा घरातील व्यक्तीच्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम लगेच दिसून येत असतो.

अशा घरातील काही वास्तूदोषामुळे मुलांच्या अभ्यासावरही परिणाम होतो. या वास्तूदोषामुळे मुलांकडून अभ्यास करून घेणं पालकांसाठी मोठी अडचण असते. बर्‍याच वेळा मुलं व्यवस्थित अभ्यास करत नसतील तर, पालकांचं टेन्शन आणखीन वाढतं. याला वास्तुमधील दोष हे देखील एक कारण असू शकतं. 

आपल्या मुलांचे मन अभ्यासात केंद्रित होत नसेल एकाग्रतेने अभ्यास करता येत नसेल तर, हे वास्तु दोषांमुळे देखील होऊ शकतं. काही वास्तू टिप्स वापरुन आपण आपल्या मुलांचं शिक्षण आणि भविष्याशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता.

1) आपल्या मुलांनी परिश्रमपूर्वक अभ्यास करावा आणि आयुष्यात यश मिळवावं असं वाटत असेल तर वास्तूशास्त्रानुसार त्यांची अभ्यासाची खोली तयार करा. 

2) मुलांची अभ्यासाची रूम पूर्व,उत्तर किंवा ईशान्येकडे बनवावी.वास्तुशास्त्रानुसार,अभ्यासाची खोली कधीच पश्चिम दिशेला नसावी. 

3) मुलाने फक्त पूर्व दिशेकडे तोंड करून अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित राहतं आणि निश्चितच यश प्राप्त होतं.

4) वास्तूशास्त्रानुसार विद्यार्थ्यांनी नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला डोकं करून झोपावं. पश्चिमे दिशेला डोकं करुन झोपण्याने अभ्यासाची इच्छा अधिक वाढते.

5) वास्तूचा विचार करता अभ्यासांच्या खोलीत सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असावा. सूर्य नकारात्मक गोष्टी नष्ट करतो आणि सकारात्मक उर्जा प्रसारित करतो असं मानलं जातं. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सकारात्मक उर्जा आवश्यक आहे सूर्यप्रकाश स्टडी रूममध्ये येण्यासाठी सकाळी खोलीच्या खिडक्या खुल्या ठेवा.

6) सरस्वती ही विद्येची देवी मानली जाते,म्हणूनच सरस्वती देवीचं चित्र खोलीत ठेवलं पाहिजे. वास्तू नुसार सरस्वतीचा फोटो विद्यार्थी अभ्यास करतेवेळी पाहतील अशा ठिकाणी ठेवा.

7) मुलाला अभ्यास आवडत नसेल आणि किंवा अभ्यासाचं नाव घेताच आळस वाढत असेल तर,अभ्याच्या खोलीत हिरवा रंग वापरा. वास्तुशास्त्रानुसार, अभ्यासाच्या खोलीतील भिंतींचा रंग,पडद्यांचा रंग आणि अभ्यासाच्या टेबलाचा रंग हिरवा ठेवावा.वास्तुशास्त्राच्यामते,बीम,जॉईंट किंवा पिलर खाली विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसू नये. कारण, त्यामुळे अभ्यासात मन लागत नाही आणि मानसिक तणावही वाढतो.

( या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. सकाळ त्याची पुष्टी करत नाही.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT