Vastu Tips esakal
लाइफस्टाइल

Vastu Tips : घरात पिंपळाचं झाड उगवलं तर दुर्लक्ष करू नका; वेळीच सावध व्हा, नाहीतर घर तुटायला वेळ नाही लागणार

पिंपळाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि भगवान शिव राहतात असे म्हणतात

Pooja Karande-Kadam

Vastu Tips : आपले रोजचे जीवन जगताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. केवळ तुमचे वागणे तुमच्या प्रगतीच्या आड येते असे नाहीतर. कधी कधी तुम्हाला मेहनतीचे योग्य फळ मिळत नाही. तेव्हा चूक तुमची नसते तर ती तुमच्या वास्तूत असलेल्या दोषांचाही परिणाम असू शकतो.

आता हेच पहा, पिंपळाचे झाड कुठेही उगवते. घराच्या भिंतीत, छतावरही हे झाड उगवते. त्या झाडाचे काय करावे हे अनेकदा लोकांना माहिती नसतं. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, पिंपळाचे झाड घरात वाढवणे अशुभ असते.

हिंदू धर्मात पिंपळाचे झाड अतिशय पवित्र मानले जाते. पिंपळाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि भगवान शिव राहतात असे म्हणतात. शास्त्रात या झाडाबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत आज वास्तुशास्त्रात आचार्य इंदू प्रकाश यांच्याकडून जाणून घेऊया पिंपळाच्या झाडाविषयी.

वास्तविक, पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते कारण सर्व देवी-देवता पिंपळाच्या झाडावर वास करतात. पण घरात पिंपळाचे झाड असणे वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही. पिंपळाचे झाड घरात वाढणे फारच अशुभ आहे. त्यामुळे पिंपळाचे झाड घरात वाढू देऊ नये आणि वाढले तर ते उपटून टाकावे.

साधारणपणे आपण सर्वांनी पाहिलेच असेल की घराच्या छतावर किंवा भिंतीच्या आधारावर अनेक वेळा पिंपळाचे झाड उगवते. मग या परिस्थितीत काय करावे हे लोकांना समजत नाही. जर तुमच्या घरात पिंपळाचे झाड पुन्हा पुन्हा उगवत असेल तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. त्यावर काय उपाय करावे याची माहिती घेऊयात. (Vastu Tips)

जर तुमच्या घरात पिंपळाचे झाड उगवले असेल तर करा या गोष्टी

तुमच्या घरात पिंपळाचे झाड उगवले असेल तर ते थोडे मोठे होऊ द्या. त्यानंतर ते मातीसह खणून दुसऱ्या ठिकाणी लावावे.

घरामध्ये पिंपळाचे झाड असल्यामुळे घरातील सदस्यांची प्रगती होत नाही आणि त्याच्या उपस्थितीमुळे रोज नवीन समस्या निर्माण होतात. पिंपळाचे झाड तोडू नये कारण ते करणे अशुभ मानले जाते.

विशेष स्थितीत एखादी वस्तू कापण्याची गरज भासल्यास पूजा केल्यानंतर ती फक्त रविवारीच कापावी, इतर कोणत्याही दिवशी नाही.

जर तुमच्या घरात पिंपळाचे झाड वारंवार उगवत असेल तर त्या पिंपळाच्या झाडाची ४५ दिवस पूजा करावी आणि त्याला कच्चे दूध अर्पण करत राहावे. त्यानंतर ४५ दिवसांनी पिंपळाचे रोप त्याच्या मुळांसह इतर ठिकाणी लावा. असे केल्याने वास्तुदोष होणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT