Vastu Tips esakal
लाइफस्टाइल

Vastu Tips : घरात लाल रंगाच्या वस्तू कुठेही ठेऊ नका, आधी वास्तूचा हा नियम वाचा

घरात योग्य जागी असलेले हे रंग कुटुंबातील सदस्यांच आयुष्य रंगवतील

Pooja Karande-Kadam

Vastu Tips: आपण जेव्हा एखादे चित्रपटातील किंवा मालिकेतील घर पाहतो. किंवा एखाद्याच्या घरातील वस्तूंचे ठेवण पाहतो. तेव्हा आपल्या घरातही असेच फर्निचर, शोभेच्या वस्तू ठेवाव्यात असे वाटते. कोणाच्या घरात काहीतरी पहायचं आणि ते आपल्या घरात लागू करायचं हा तर आजकालचा ट्रेंड आहे. पण असं करणं तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं.

तुम्ही जेव्हा कोणा यशस्वी व्यक्तीच्या घरी जाता. तेव्हा त्यांनी घरात केलेले बदल तुम्ही कोणताही विचार न करता आपल्या घरात करून घेता. पण, प्रत्येकाच्या वास्तूसाठी काही वेगळे बदल, वेगळे नियम लागू होतात.

वास्तूशास्त्रात घरात असलेल्या प्रत्येक वस्तूसाठी काही नियम सांगितले गेलेत. त्यानुसार घरात पांढरा, हिरवा अन् लाल रंगाच्या वस्तू कशा व कोणत्या दिशेला ठेवाव्यात. याबद्दल जाणून घेऊयात. (Vastu Tips)

लाल रंग

अनेक लोक घरात लाल रंगाच्या वस्तू ठेवतात. लाल रंग आदीशक्तीचे स्वरूप मानले जाते. शुभप्रसंगीही लाल रंगाची वस्त्रे परिधान केली जातात. घरात वापरल्या जाणार्‍या लाल रंगाशी संबंधित गोष्टींमध्ये टब, बादली, कार्पेट इत्यादींचा समावेश असू शकतो.

लाल रंगाशी संबंधित वस्तू घराच्या दक्षिण दिशेला ठेवाव्यात. असे केल्याने वास्तुचे शुभ परिणाम प्राप्त होतात. कारण लाल रंग अग्नि तत्वाशी संबंधित आहे आणि दक्षिण दिशा देखील अग्नि तत्वाशी संबंधित आहे. त्यामुळे लाल रंगाशी संबंधित वस्तू दक्षिण दिशेला ठेवणे चांगले.

लाल रंगाच्या वस्तू दक्षिण दिशेला ठेवल्याने घरातील लहान मुलाला किंवा मुलीला सर्व प्रकारे फायदा होतो. दृष्टी चांगली राहते आणि त्यांच्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही.

हिरवा रंग

वास्तुशास्त्रानुसार हिरव्या रंगाशी संबंधित वस्तू पूर्व किंवा आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात ठेवणे चांगले. याशिवाय घरामध्ये या दिशांना झाडे लावून तुम्ही तिथे हिरवा रंग हिरवा रंग आणि या दोन्ही दिशा लाकडी घटकाशी संबंधित आहेत.

त्यामुळे हिरव्या रंगाच्या वस्तू पूर्व किंवा आग्नेय दिशेला ठेवणे शुभ असते. हिरव्या रंगाच्या वस्तू नेहमी पूर्व दिशेला ठेवल्याने घरातील मोठ्या मुलाला कामात यश मिळते. सर्व क्षेत्रात त्याचा नावलौकीक होतो. (Garden Tips)

पांढरा रंग

वास्तूनुसार, पांढरा रंग धातूशी संबंधित आहे. धातूचा संबंध पश्चिम दिशेशी म्हणजे उत्तर-पश्चिम दिशेशी आहे. त्यामुळे पांढर्‍या किंवा चंदेरी रंगाशी संबंधित वस्तू या दोन्ही दिशांना ठेवणे चांगले.

पांढऱ्या रंगाशी संबंधित वस्तू पश्चिम दिशेला ठेवल्याने आनंद मिळतो. सौंदर्य वाढते आणि घरातील लहान मुलीलाही फायदा होतो, तर पांढर्‍या रंगाशी संबंधित वस्तू उत्तर-पश्चिम दिशेला ठेवल्याने वडिलांचे आरोग्य चांगले राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT