Vastu Tips sakal
लाइफस्टाइल

Vastu Tips: कारमध्ये या गोष्टी ठेवाच, संकट दूर गेलच म्हणून समजा

कार खरेदी करताना तुम्हाला काही वास्तु टिप्स देखील लक्षात घ्यायला हव्यात.

Aishwarya Musale

आजकाल जवळपास प्रत्येकाकडे स्वतःची कार आहे. प्रत्येकजण आपल्या बजेटनुसार कार खरेदी करतो. कार हा जीवनाचा अत्यावश्यक भाग बनलेली आहे. कार खरेदी करताना आपण तिच्या वैशिष्ट्यांकडे लक्ष देतो. पण कार खरेदी करताना तुम्हा काही वास्तु टिप्स देखील लक्षात घ्यायला हव्यात.

वास्तुशास्त्र हे असे शास्त्र आहे जे मानवी जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यामुळे नकारात्मकता दूर होते आणि येणारे संकट टळते. आणि तुमचा प्रवास सुखकर होतो. चला जाणून तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

देवाची मूर्ती

वास्तुशास्त्रानुसार देवाची मूर्ती गाडीत ठेवल्यास त्यातून वास्तुदोष दूर होतात. जर तुम्हाला मूर्ती ठेवता येत नसेल तर तुम्ही देवाशी संबंधित कोणतीही वस्तू जसे की भगवान शिवाचा डमरू, भगवान कृष्णाचे मोरपंख ठेवू शकता.

काळा कासव

काळ्या कासवाला वास्तुशास्त्रात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. जर तुम्हाला तुमच्या कारमधून नकारात्मक ऊर्जा दूर करायची असेल आणि कोणतीही अडचण नसेल तर तुम्ही तुमच्या कारमध्ये काळे कासव ठेवू शकता. हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

तेल 

वास्तूनुसार कारमध्ये आवश्यक तेलाची छोटीशी कुपी ठेवल्याने सकारात्मकता येते. त्यामुळे मन शांत आणि उत्साही होते.

कारमध्ये मीठ ठेवा

वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही कारच्या सीटखाली रॉक सॉल्ट ठेवले तर या उपायाने अपघात होण्याची शक्यता कमी होते. कारमध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. पण मद्यपान करून गाडी चालवण्यावर कोणताही उपाय काम करत नाही.

पाणी

वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही तुमच्या कारमध्ये पाण्याने भरलेली बाटली ठेवली तर या उपायाने जल तत्व मजबूत होते आणि लोहाशी संबंधित कोणताही वास्तु दोष दूर होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT