Kitchen  sakal
लाइफस्टाइल

Kitchen Vastu Tips: घरात स्वयंपाकघर बनवताना दिशा महत्वाची, या 4 गोष्टींची घ्या काळजी

स्वयंपाकघर ही आपल्या सगळ्यांच्या घरातील प्रमुख जागा मानली जाते.

Aishwarya Musale

Vastu Tips : घर बांधताना वास्तूचे नियम लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः स्वयंपाकघर. कारण स्वयंपाकघर हा घराचा महत्त्वाचा भाग मानला जातो. ही अशी जागा आहे जिथे गृहिणी जास्तीत जास्त वेळ घालवते. या ठिकाणी संपूर्ण कुटुंबातील सदस्यांसाठी अन्न तयार केले जाते.

अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात काही दोष असल्यास त्याचा वाईट परिणाम महिलांवर होतो. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघराशी संबंधित नियमांकडे दुर्लक्ष केल्याने तुम्हाला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

तसेच संपूर्ण कुटुंबाला याचा फटका बसतो. चला जाणून घेऊया स्वयंपाकघराशी संबंधित कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावे: ज्योतिषाच्या मते, घर बांधताना नेहमी लक्षात ठेवा की तुमचे स्वयंपाकघर आग्नेय कोनात (दक्षिण-पूर्व) दिशेला असावे. यामुळे जीवनात आनंद मिळतो. दुसरीकडे, ईशान्य दिशेला स्वयंपाकघर बांधणे टाळावे. हलकी वस्तू आणि पूजा करण्यासाठी ईशान्य दिशेला जागा असणे चांगले.

स्वयंपाक करताना कोणत्या दिशेला तोंड असावे: स्वयंपाक करताना दिशेची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असते. स्वयंपाक करताना नेहमी लक्षात ठेवा की तुमचा चेहरा पूर्वेकडे असावा. याशिवाय जेवण बनवणाऱ्याच्या पाठीमागे स्वयंपाकघराचा दरवाजा नसावा याकडेही लक्ष दिले पाहिजे.

स्वयंपाकघरात पाण्याची जागा: पाणी ही स्वयंपाकघरातील एक आवश्यक वस्तू आहे. कारण कोणतीही वस्तू बनवताना फक्त पाण्याची सर्वाधिक गरज असते. अशा परिस्थितीत बहुतांश लोक गॅसजवळ पाणी ठेवतात, जे चुकीचे आहे. अशी चूक चुकूनही कोणी करू नये. असे केल्याने तुमच्या घरात संकटाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

तुटलेली भांडी वापरणे टाळा: किचनमध्ये तुटलेली भांडी वापरणे टाळा. खरं तर, काही वेळा काही भांडी थोडी खराब होतात, आपण ती वापरत राहतो, पण ते चुकीचं आहे. अशा भांड्यांमध्ये अन्न शिजवू नका किंवा देऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT