Devghar Vastu Tips esakal
लाइफस्टाइल

Devghar Vastu Tips: घरातील जून्या देव्हाऱ्याचं काय करायचं, कोणाला द्यायचा की विसर्जित करायचा?

देवघरात हे नियम पाळा

Pooja Karande-Kadam

Devghar Vastu Tips : प्रत्येक घरात एक वस्तू असते ती म्हणजे देवघर, किंवा देवासाठी ठेवलेली जागा. जिथे असलेली सकारात्मक उर्जा त्या घराला बांधून ठेवते. घरातील लोकांना प्रत्येक संकटात तिथूनच बळ मिळते. हिंदू घरांमध्ये तर मंदिराची प्रतिकृती असलेल्या घरातच भगवंत विराजमान असतात.

हिंदू धर्मात पूजेला खूप महत्त्व आहे. यामाध्यमातून आपण देवाप्रती आदर व्यक्त करतो आणि देवी-देवतांचा आशीर्वाद मिळवतो. देवाची पूजा करण्यासाठी आणि बसवायला आपण घरात देवघर बांधतो.

वास्तुशास्त्रातही देवघराला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे म्हटले जाते की, देवघर हे घरातील सर्वात सकारात्मक स्थान आहे, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी राहते. (Vastu Tips : Know some rules before changing the temple in the house, how auspicious is it to give the old temple to someone? learn)

अनेकदा देवघर जुने झाल्यावर ते बदलण्याचा किंवा काढून टाकण्याचा विचार आपण करतो. परंतु शास्त्रांमध्ये ते शुभ मानले जात नाही. होय, घराचे देवघर बदलणे किंवा काढून टाकणे शुभ मानले जात नाही. पण काही वेळा देवघर बदलण्याची गरज भासते. अशा परिस्थितीत जुन्या देवघराचे काय करायचे. चला जाणून घेऊया.

घरात ठेवलेल्या मंदिराचे काय करावे?

ज्योतिषींच्या मते, घरात ठेवलेले देवघर सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते. जेव्हा आपण आपल्या घरात पूजा करता तेव्हा त्याची ऊर्जा देखील आपल्या घरात राहते. त्याचवेळी जेव्हा तुम्ही ते विकण्याचा किंवा कुणाला देण्याचा विचार करता तेव्हा त्याची सर्व सकारात्मक ऊर्जा त्याच्यासोबत जाते.

जर तुम्ही तुमचं देवघर कुणाला देण्याचा किंवा विकण्याचा विचार करत असाल तर जुन्या मंदिरातून सर्व देवी-देवतांची मूर्ती किंवा चित्र काढण्यापूर्वी नव्या मंदिराची पूजा करून घ्यावी. त्यात देवतांची ब्राह्मणांकडून मंत्रोच्चाराने विधिवत स्थापना करून घ्यावी.

अशा प्रकारे नवीन देवघरात पूजा केल्याने मंदिरात ऊर्जेचा संचार होतो. दुसरीकडे जुन्या देवी-देवतांच्या मूर्ती किंवा चित्रे काढायची असतील तर ती पाण्यात टाकू नका, देवघराच्या पुजाऱ्याला देऊ शकता. या मूर्ती कोणत्याही चौकात किंवा झाडाखाली ठेवू नयेत. तुम्ही त्यांचे विसर्जन करू शकता.

कोणत्या दिवशी स्थापित करावे?

सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस घरात मंदिराची स्थापना करण्यासाठी सर्वात शुभ दिवस आहेत. मंगळवार, शनिवार आणि रविवारी घरात मंदिराची स्थापना करण्यास मनाई आहे.

देवघर कोणत्या दिशेला असावे

तुमच्या घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर-पूर्व दिशेला देवघर बनवू शकता. या दिशेला पूजा केल्याने देवी-देवता लवकर प्रसन्न होतात. देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य (पश्चिम-दक्षिण) कोपऱ्यातून बाहेर जाते.

देवघर आणि सूर्यप्रकाश

घरामध्ये देवघर अशाठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते, त्या घरांमधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. सूर्य प्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक उर्जा नष्ट होते आणि सकारात्मक उर्जा वाढते. (Vastu Tips)

देवघरात हे नियम पाळा

देवघरात लावलेल्या समईची ज्योत दक्षिणेकडे असू नये. समईत नेहमी विषम संख्येतील वाती असाव्यात. तसेच निरंजन जाळतना तूप व तेल एकत्र घालू नये.

एका घरात दोन शिवलिंगे, शाळिग्राम, सूर्यकांत, चक्रांक, गणपती व शंख पुजू नये. शाळिग्राम सम पुजावेत. मात्र दोन पुजू नयेत. विषमात एक पुजावयास हरकत नाही.

पूजन करताना देवाला नेहमी करंगळी जवळच्या बोटाने अर्थातच अनामिकेने गंध लावावे.

देवपूजा करताना आपणं वापरत असलेली आसन आणि जपमाळ कधीही दुसर्‍यांना वापरण्यासाठी देऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : कुख्यात अमन साहू टोळीचा सदस्य सुनीलकुमारला अझरबैजानमधून भारतात परत आणण्यात यश

एकल फौज आणि विसंगतीपूर्ण हिंसा

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

Sunday Special Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा चवदार ब्रेड पिझ्झा, लगेच नोट करा रेसिपी

दैव की कर्म?

SCROLL FOR NEXT