Vastu tips Esakal
लाइफस्टाइल

Vastu Tips: घरात हे छोटे छोटे बदल करा आणि मोठा आनंद मिळवा

वास्तुशास्त्रानुसार घराचे बांधकाम केल्यास, व्यक्तीच्या जीवनातील अडचणी बऱ्याच अंशी कमी होतात आणि त्याच्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण राहते, असे मानले जाते.

सकाळ डिजिटल टीम

सनातन धर्मात वास्तुशास्त्राला महत्त्वाचे स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार घराचे बांधकाम केल्यास, व्यक्तीच्या जीवनातील अडचणी बऱ्याच अंशी कमी होतात आणि त्याच्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण राहते, असे मानले जाते. घराच्या बांधकामाव्यतिरिक्त वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही बदल केले तर घरात सुख-समृद्धीचे आगमन तर राहतेच, त्याचबरोबर व्यक्तीला जीवनात अनेक फायदे मिळतात. प्रत्येकाने कोणते बदल केले पाहिजेत? याविषयी इंदूरचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा सांगत आहेत.

● घराचे प्रवेशद्वार 

वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा किंवा प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ-सुंदर असावे. दार उघडताना आणि बंद करताना कुठलाही आवाज येणार नाही याची काळजी घ्या.

● घरात कापूर जाळणे.

वास्तुशास्त्रात असे सांगण्यात आले आहे की, नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी घरात कापूर जाळल्याने घरात सकारात्मक उर्जेचा संचार वाढतो आणि घराचे वातावरण शुद्ध होते.

● देवघर

वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघराला महत्त्वाचे स्थान आहे, देवघर नेहमी ईशान्य दिशेला बांधावा. याशिवाय देवघराच्या वर किंवा खाली जिना आणि स्नानगृह नसावे, याची विशेष काळजी घ्यावी.

● स्वच्छता 

वास्तुशास्त्रानुसार घरात स्वच्छता असणे अत्यंत आवश्यक आहे. घरातील धूळ आणि कोळ्याचे जाळी नियमितपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे. यासोबतच बाथरूम देखील स्वच्छ असले पाहिजे, अन्यथा घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात आणि त्यामुळे घरातील सदस्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

● योग्य दिशेला झोपणे. 

वास्तुशास्त्रानुसार झोपताना कधीही दक्षिण दिशेला पाय करू नयेत. असे केल्याने व्यक्तीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. दक्षिण दिशेला पाय करून झोपणे अशुभ मानले जाते.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सकाळ त्याची  कोणतीच  शाश्वत हमी देत नाही.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणावर ठाम; १८ सप्टेंबरसाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT