Vastu Tips Esakal
लाइफस्टाइल

Vastu Tips: घरामध्ये पैसे आणि मौल्यवान वस्तू या दिशेला ठेवा; धनाची वाढ झपाट्याने होईल

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये एकाच ठिकाणी पैसा, दागिने आणि मौल्यवान वस्तू ठेवल्याने त्यात वाढ होते.

सकाळ डिजिटल टीम

Rigth Direction For Money: वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीसाठी एक निश्चित दिशा देण्यात आली आहे. कोणतीही वस्तू योग्य दिशेने ठेवली तर त्याचा त्या व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होत असतो. तुमच्या घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा चांगला वाईट परिणाम हा त्या व्यक्तीच्या आरोग्यावर आणि प्रगतीवर होत असतो.

त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव राहते. घरामध्ये पैसा ठेवण्यासाठी वास्तुमध्ये एक विशिष्ट दिशा देखील सांगितली आहे.

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये एकाच ठिकाणी पैसा, दागिने आणि मौल्यवान वस्तू ठेवल्याने त्यात वाढ होते. तसेच तुमच्या घरात समृद्धी टिकून राहते.

घरामध्ये पैसा ठेवण्यासाठी वास्तुमध्ये एक विशिष्ट दिशा देखील सांगितली आहे.

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये एकाच ठिकाणी पैसा, दागिने आणि मौल्यवान वस्तू ठेवल्याने त्यात वाढ होते. तसेच तुमच्या घरात समृद्धी टिकून राहते.

चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊया की वास्तू तज्ज्ञांच्या मते धनासाठी घराची कोणती दिशा योग्य असल्याचे सांगितले जाते. वास्तुशास्रानुसार घरामध्ये पैसे आणि मौल्यवान वस्तू कोणत्या दिशेला ठेवण्यासंदर्भाचे वास्तूचे नियम आहेत

● तुमच्या घरातील तिजोरी उत्तर दिशेला ठेवावी.

वास्तुशास्त्रानुसार घराची उत्तर दिशा ही संपत्तीची दिशा असल्याचे सांगितले जाते. वास्तु तज्ज्ञ सांगतात की  तुम्ही तुमच्या घरातील पैसा ज्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवता ते तिजोरी नेहमी उत्तर दिशेला ठेवावी. असे मानले जाते की या दिशेला राहिल्याने सौभाग्य प्राप्त होते. तसेच, पैसे दुप्पट होण्याची शक्यता असते .

● तिजोरीचे दार या दिशेला कधीच उघडू नका

जर तुम्ही तुमची तिजोरी उत्तर दिशेला ठेवत असाल तर लक्षात ठेवा की त्याचा दरवाजा दक्षिण दिशेला उघडू नये. अशी श्रद्धा आहे की धनाची देवी दक्षिणेकडून प्रवास करून उत्तरेला स्थायिक होते. त्यामुळे उत्तर दिशेला ठेवलेला पैसा शुभ असतो आणि दक्षिण दिशेला पैसा कधीच थांबत नाही

● 'या' दिशेनेही पैसा ठेवता येईल

जर तुम्ही घरामध्ये उत्तर दिशेला तिजोरी किंवा पैसा ठेवू शकत नसाल तर तुम्ही पूर्व दिशेलाही पैसे ठेवू शकता. दुकानाची तिजोरी या दिशेला ठेवल्यास विशेष फलदायी असते, असा समज आहे. त्याच वेळी, रोखपाल दक्षिण-पश्चिम दिशेला तोंड करून बसला असेल तर तिजोरी त्याच्या डाव्या हाताला असावी. त्याच वेळी, तिजोरी उजव्या बाजूला असली पाहिजे जर तोंड पूर्वेकडे असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! भाजपा आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ, नेमकं काय घडलं?

Commonwealth Games 2026: अपघातात पाय गमावला, बॉक्सरचा गोळाफेकपटू झाला... सोनम राणाने ऐतिहासिक सुवर्ण जिंकले; दोन रौप्यपदकही खात्यात आले

Ambulance Policy: रुग्णांसाठी मोठा दिलासा! महाराष्ट्रात नवे अ‍ॅम्ब्युलन्स धोरण लागू; ४ अ‍ॅप्सशी जोडणार, जाणून घ्या नवी प्रणाली

Navi Mumbai: नवी मुंबईतील वृद्धाची कोट्यवधींची फसवणूक! डिजिटल अरेस्टच्या नावाखाली दीड महिना मानसिक छळ

Daund Kidnapping: दौंडमध्ये तरुणीचे मध्यरात्री अपहरण; माजी नगराध्यक्ष बादशहा शेखसह ११ जणांवर अपहरण, दरोडा, विनयभंगासह अतिउग्र गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT