पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत करतात. हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे. यावर्षी 21 जून रोजी शुक्रवारी वटपौर्णिमेचा उपवास करण्यात येणार आहे.
हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत केले जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.
या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यसह जीवनात सुख आणि संपत्ती देखील प्राप्त होते. यामुळे या दिवशी वटसावित्रीचे व्रत विधीनुसार पूजा केल्यास शुभ फळ मिळते. ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते. त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावी अशी वडाच्या झाडाच्या मागची पूजा करण्याची धारणा असते. (Vat Purnima 2024 )
वटसावित्रीची पौर्णिमा व्रत उद्या सकाळी सात वाजून 31 मिनिटांनी सुरू होईल. तर त्याची 22 जूनला संध्याकाळी पाच वाजून 37 मिनिटांनी संपेल. वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्यात. तसेच कोणता रंग आपण चुकूनही परिधान करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण पाहुयात.
कुंकवाचा लाल रंग
वटपौर्णिमेला नवीन साडी ही खरेदी करतात. किंवा काही महिला अगोदरच्या साड्या देखील घालतात. साडी कोणत्याही पॅटर्नची असली तरी त्याचे रंग मात्र शुभच असायला हवेत. पहिला रंग आहे लाल. हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा रंग आहे. हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह, सौभाग्य, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतिक आहे.
लाल रंग देवी लक्ष्मीला देखील आवडतो. जीवनातील प्रगतीशी संबंधित हा लाल रंग आहे. त्यामुळे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी घालू शकता तसेच लाल रंगाच्या बांगड्या देखील घालू शकता.
निसर्गाचा हिरवा रंग
दुसरा रंग आहे हिरवा. हिरवा रंग हा बुध ग्रहाची प्रतिनिधित्व करतो. बुद्धीला कारक असलेल्या हा रंग व्यापार, रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देणारा आहे, असे समजले जाते. हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी असतात. आपल्याच मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्या तंत्रित राहणारी आणि तरीही बुद्धीप्रमाणे वारी असतात.
प्रेमाचा गुलाबी रंग
तिसरा रंग आहे तो म्हणजे गुलाबी. तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेला घालू शकता. गुलाबी रंग हा प्रेमाची भावना किंवा नम्रपणा दर्शवतो. गुलाबी रंग आनंदाचे प्रतीक आहे. हा रंग बघितल्यानंतर पाहणाऱ्या अन् परिधान करणाऱ्या व्यक्तीला शांत आनंदी वाटतं. तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधी जाणवत नाही, असंही काही लोक सांगतात.
चौथा रंग आहे भगवा,केशरी
भगवा रंग ज्ञान त्या शौर्य पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील वर या रंगांचे ध्वज आहेत. हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही रंग आहे जो अ धर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो. तुम्ही केशरी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता.
पाचवा रंग पिवळा
या यादीतील शेवटचा पाचवा रंग आहे तो म्हणजे पिवळा. पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग आहे. पिवळा रंग जर आपण वटपौर्णिमेच्या दिवशी परिणाम केला तर आपल्याला भगवान विष्णूचा देखील आशीर्वाद हा प्राप्त हो.तो विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय असून पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होतो. वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अहिंसा प्रेम आनंद आणि ज्ञानाची प्रतीक मानले जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पिवळा रंग हा परिधान करू शकता.
हा रंग टाळा
काही असे रंग आहे त्या रंगाची साडी आपल्याला वट पौर्णिमेदिवशी घालायची नाही. तर त्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे काळा रंग काळ्या रंगाची साडी. आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायची किंवा तुमची एखादी अगदी लाल रंगाची साडी असेल आणि तिच्यावरती काळ्या रंगाचा ब्लाऊज, पेटीकोट परिधान करू नका. काळ्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाहीत. आणि कळ्या रंगाची टिकली देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लावायची नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.