puranpoli
puranpoli google
लाइफस्टाइल

वटपौर्णिमा विशेष: मैद्याची पुरणपोळी..

दिपाली सुसर

मुंबई : आज वटसावित्री पौर्णिमा म्हणजे सुवासिनीचा आवडता सण वटसावित्री पौर्णिमाला सुवासिनी उपवास करतात. दिवसभराचा उपवास सोडण्यासाठी मग विशेष काही करायचा बेत असतो. त्यामुळे आज वटसावित्री पौर्णिमा विशेष बेत आपण पाहणार आहोत. तो म्हणजे मैद्याची पुरणपोळी

अगदी पूर्वीपासून मैद्याची पुरणपोळी करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. कारण ही पोळी अत्यंत लुसलुशीत होते आणि चवीला खूपच मस्त लागते. चला तर मग बघु या पारंपरिक पद्धतीची मैद्याची पुरणपोळी कशी करायची ?

मैद्याच्या पुरणपोळी करता लागणारे साहित्य

1)दोन वाटी हरबरा दाळ

2)दोन वाटी बारीक केलेला गुळ

3)दिड वाटी मैदा

4)चवीनुसार मीठ

5)तुप

6)चार चमचे मैदा (पोळी लाटण्यासाठी) अथवा कणीक

7)विलायची पावडर

8) अर्धा कप दूध

पुरणपोळीची कृती:

चणाडाळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजवून घ्या नंतर कुकरमध्ये शिजवून घ्या.शिजलेल्या चणाडाळी अन गुळ दोन्ही व्यवस्थित मिक्स करुन घ्या .त्या नंतर त्यात विलायची पावडर घाला. पुरण तयार आहे. नंतर पुरण यंत्रातून पुरण वाटून घ्या.

जर तुम्हाला पांढऱ्या शुभ्र पुरणपोळ्या हव्या असतील तर तुम्ही मैद्याची पुरणपोळी करु शकता. याशिवाय मैदा आणि गव्हाची कणिक असे दोन्ही मिसळूनही खुसखुशीत पुरणपोळी करता येते.

जर तुम्ही मैदा घेतला असेल तर तो अगदी हलक्या हाताने मळा. यासाठी थोडा वेळ लागेल.कारण चांगली पुरणपोळी करण्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतात.

आता तयार पुरणाचा एक गोळा आणि पिठाचा गोळा घ्या. ज्यापद्धतीने आपण पराठा लाटतो. अगदी तशाच हलक्या हाताने पुरळपोळ्या लाटायला घ्या. पुरण सगळीकडे पसरण्यासाठी त्या फार प्रेमाने आणि हळुहळु पुरण पोळया लाटाव्या लागतात.

एकाच बाजूने पुरणपोळ्या लाटू नका.सगळीकडे सारखा दाब देऊन पुरणपोळ्या लाटा.

आता पुरणपोळी लाटल्यानंतर ती छान तुप टाकून मंद गॅसवर भाजुन घ्या. जर तुम्ही पुरणपोळ्या छान लाटल्या असतील तर त्या फुगतात.

अशा पध्दतीने आपल्या पुरणपोळ्या तयार झाल्या .तुम्ही पुरणपोळी दुध,खिर किंवा आवडत असेल तर आमरसासोबत खाऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train Accident: फक्त नितीश कुमार नाही तर या दोन रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून दिलेला राजीनामा! कोण होते ते?

Latest Marathi Live Updates : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तातडीने पश्चिम बंगालला रवाना

Babar Azam : बाबर आझमने मोडला MS धोनीचा 'ग्रँड रेकॉर्ड'! कर्णधार म्हणून केली मोठी कामगिरी

Pune Draught: पुणे जिल्ह्यात पारंपारिक दुष्काळ! शरद पवारांचं मुख्यंमत्र्यांना पत्र; म्हणाले, कायमचा...

Kanchanjunga Express Accident: कांचनजंगा एक्स्प्रेसचे डबे उडाले, मालगाडीची मागून धडक! भीषण अपघात कसा घडला? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

SCROLL FOR NEXT