Vastu Tips For Plants  Sakal
लाइफस्टाइल

Vastu Tips: स्वयंपाक घरात झाडं ठेवणं शुभ की अशुभ, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरात झाड ठेवणे शुभ मानले जाते की नाही हे जाणून घेऊया.

पुजा बोनकिले

अनेकांना घरात झाडे ठेवायला आवडतात. तर अनेक लोक स्वयंपाक घरात झाडे ठेवतात. पण वास्तुनुसार स्वयंपाक घरात झाडे ठेवणे किती योग्य आहे हे जाणून घेऊया. तसेच घरात झाडे ठेवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

वास्तुनुसार स्वयंपाक घरात माता अन्नपूर्णा वास करते. याशिवाय अग्निदेव हे दैवी तत्वाच्या रूपात स्वयंपाकघरात उपस्थित असतात. स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तू कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असते. याचा अर्थ स्वयंपाकघरात नऊ ग्रह स्थापित असतात.

असे मानले जाते की जर तुम्हाला स्वयंपाकघरात झाडे लावायची असतील आणि स्वयंपाकघरात मधोमध जागा नसेल तर तुम्ही स्वयंपाकघराला लागून असलेल्या बाल्कनीमध्येही झाडे लावू शकता. किचनच्या बाल्कनीमध्ये झाड लावणे शुभ मानले जाते. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.

वास्तुनुसार घरातील स्वयंपाकघरात झाडे लावणे योग्य नाही तर झाडे देवी-देवता आणि ग्रहांनुसारच लावावीत. चुकीची रोपे लावल्याने ग्रह दोष तर होतातच पण माता अन्नपूर्णा नाराज होते. याशिवाय वास्तू दोषांचाही त्रास होऊ शकतो.

वास्तुनुसार जर तुम्ही स्वयंपाकघरात झाड लावण्याचा विचार करत असाल तर त्यांना स्वयंपाकघराच्या कोणत्याही कोपऱ्यात न ठेवता मध्यभागी ठेवावे. यामुळे स्वयंपाकघरातील ऊर्जेचा स्त्रोत एकसमान राहतो आणि कोणतीही नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकत नाही.

घरात झाडे लावताना कोणती काळजी घ्यावी

  • घरात काटेरी झाडे ठेऊ नका. यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

  • तुम्ही घरात फुल-फळांचे छोटे झाड लावू शकता.

  • घरात वेली किंवा छोटे झाड असेल तर नेहमी स्वच्छ ठेवावे.

  • वास्तुनुसार घरात तुळशीचे झाड लावणे शुभ मानले जाते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागच्या राजाच्या शाही विसर्जन सोहळा

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवात 'चिकमोत्याची माळ' गाण्यावर थिरकली तरुणाई; सोशल मीडियावर रील्सना प्रचंड प्रतिसाद

Viral Video: भक्तीची ताकद की गणरायाचा चमत्कार? पाण्याचा मोठा प्रवाह, तरीही विसर्जनावेळी मूर्ती वाहून गेलीच नाही, पाहा व्हिडिओ

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मराठी कलाकारांनी घेतले शामनगरच्या राजाचे दर्शन

Ganesh Visarjan 2025 : श्री विसर्जनादरम्यान लेंडी नदीत देगावचा तरुण बुडाला; देगाव येथे शोकाकुल वातावरणात शनिवारी अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT