लाइफस्टाइल

आता स्ट्रॉबेरी, चॉकलेट नाही, तर भाज्यांच्या फ्लेवरचे कंडोम

लोकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी विविध फ्लेव्हर्सचे कंडोम बाजारात आणले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Vegetable-themed condoms: कुटूंबनियोजन तसेच असुरक्षित लैगिक संबंधांतून एचआयव्ही संक्रमण रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनापैकी एक म्हणजे निरोध (कंडोम). अलीकडच्या काळात कंडोमच्या बाबतीत समाजामध्ये बऱ्यापैकी जागरूकता झालेली दिसून येते. आता पुरुषांप्रमाणे महिलाही मेडिकल शॉपमध्ये जाऊन कंडोमची मागणी करतात. लोकांना आकर्षित करण्यासाठी कंडोम बनवणाऱ्या कंपन्यांनी स्ट्रॉबेरी, चॉकलेट असे वेगवेगळे फ्लेव्हरदेखील बाजारात आणलेले आहेत. परंतु आता मात्र व्हेजीटेबल फ्लेव्हरचे कंडोम तुम्हाला पाहायला मिळाले, तर नवल वाटून घेऊ नका. कारण 'द हॉर्टिकल्चरल सोसायटीने भाज्यांचे फ्लेव्हरचे कंडोम आणले आहेत.

लैंगिक संबंधातील सौंदर्य तसेच नात्यांवर समुपदेशन करणाऱ्या 'द हॉर्टिकल्चरल सोसायटी' (Horticultural Society) या संस्थेने कंडोमची एक सिरीज तयार केली आहे. ही सिरीज गर्भनिरोधक साधन म्हणून तसेच सुरक्षित लैंगिक सुरक्षेच्या दृष्टीने एक वेगळा दृष्टीकोन घेऊन येत आहे.

संस्थेने विविध फळे आणि भाज्यांच्या फ्लेवर्समध्ये कंडोमची श्रेणी तयार केली आहे. यामध्ये गोसावळं (Courgette), मनुका, वांगे (Aubergine), कांदा, आणि एवोकॅडो यांचा समावेश आहे. ही कंडोमची पाकिटे प्रत्यक्षात बागेतील बियांसारखी दिसतात.

केवळ लैंगिक संबंधांदरम्यान काळजी योग्य खबरदारी न घेणाऱ्या लोकांसाठीच या कंडोमची रचना करण्यात आली नाही, तर त्यापाठीमागे जनजागृतीचाही हेतू आहे.

द हॉर्टिकल्चरल सोसायटीने आपल्या अहवालामध्ये म्हटलं आहे की, यूकेमध्ये 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये लैंगिक रोगांचे संक्रमण वाढत आहे. एसटीडी/एचआयव्ही प्रतिबंधाची विविध साधने उपलब्ध असूनही, महिला सक्षमीकरण हे दूरचे स्वप्न राहिले आहे. एचआयव्ही प्रतिबंधासाठी कंडोम अधिक महत्त्वपूर्ण ठऱत आहेत.

Relate ने नोंदवलेल्या सर्वेक्षणानुसार, 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या 43 टक्के व्यक्ती त्यांच्या लैंगिकतेमध्ये त्यांच्या आयुष्यातील इतर वेळेपेक्षा अधिक सुरक्षित आणि मुक्त आहेत. याशिवाय असे आढळून आले आहे की 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 80 टक्के लोकांनी गेल्या सहा महिन्यांत कंडोम खरेदी केले नाहीत आणि या वयोगटातील एसटीआय गेल्या 10 वर्षांत वाढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

Social Service Initiative: भिवधानोरा-पंढरपूर दिंडीतील वारकऱ्यांना तुकाराम सटाले यांच्याकडून रेनकोट वाटप; सेवाभावी उपक्रमाचे कौतुक

Davdi Free Eye Camp: दावडीत दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया; २ हजारांहून अधिक रुग्णांना नवदृष्टी

SCROLL FOR NEXT