Vegetarian Foods For Omega 3 esakal
लाइफस्टाइल

Vegetarian Foods For Omega 3: ओमेगा-3 ॲसिड कशात असतं? शाकाहारी लोकांना माहिती असलंच पाहिजे

नख तुटणं, झोप न होणे अशी लक्षण असतील तर ओळखा की...

Pooja Karande-Kadam

Vegetarian Foods For Omega 3 : ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. हे एक पोषक तत्व आहे जे रोगांशी लढण्याची क्षमता विकसित करण्यास मदत करते. 

ओमेगा-३ फॅटी अॅसिड हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करते. ओमेगा-३ फॅटी ऍसिडमुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हाडांशी संबंधित आजार टाळण्यास मदत होते. 

 ओमेगा-3 मुळे तुमचे डोळे आणि केसही निरोगी राहतात. ओमेगा-3 फॅटी अॅसिडमुळे कॅन्सरसारख्या आजारांचा धोकाही कमी होतो. या पदार्थांमधून तुम्ही ओमेगा-3 फॅटी अॅसिडची कमतरता भरून काढू शकता.

 शरीर स्वतःहून ओमेगा-३ फॅटी अॅसिड बनवू शकत नाही आणि त्यासाठी अन्नपदार्थांवर अवलंबून राहावे लागते. अन्यथा, शरीरात खूप मोठी कमतरता निर्माण होऊ शकते.

पेशींच्या कार्यासाठी हे पोषक तत्व खूप महत्वाचे आहे. शरीरात ओमेगा-३ च्या कमतरतेमुळे अनेक समस्या सुरू होतात. ज्यांच्याबद्दल पोषणतज्ञ किरण कुकरेजा यांनी माहिती दिली आहे.

आपल्याकडे फॅट हा शब्दही उच्चारावासा वाटत नाही. पण, सर्वच फॅट वाईट नसतात. काही फॅट चांगले असतात आणि ते आपल्या आरोग्याचा अविभाज्य भाग असतात. दिवसभऱात शरीरात मेदयुक्त पदार्थ जातात का याची बहुतेकांना जाणीवच नसते.

आपले शरीर फार कार्यक्षम मशीन आहे. शरीर आपल्या आहारातून भरपूर मेद घेऊन त्याची निर्मिती करते. पण, तरीही ‘ओमेगा ३’ आणि ‘ओमेगा-६’ हे आवश्यक मेद शरीर तयार करू शकत नाही.

ओमेगा ३ च्या कमतरतेमुळे काय होते

नखे तुटणे

जर तुमची नखे मऊ असतील आणि वारंवार तुटत असतील तर ते तुमच्या शरीरात काहीतरी कमतरता असल्याचे लक्षण असू शकते. हे लक्षण ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.

 झोप न येणे

जर तुम्हाला सतत थकवा, सुस्ती आणि उर्जेची कमतरता जाणवत असेल आणि तुम्हाला झोपण्यास त्रास होत असेल किंवा तुम्हाला चांगली झोप येत नसेल, तर हे ओमेगा-3 च्या कमतरतेमुळे असू शकते.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, ज्या लोकांमध्ये ओमेगा -3 चे प्रमाण जास्त आहे, त्यांना चांगली झोप येते.

लक्ष केंद्रित करण्यास अडचणी येणे

जर तुमचे कोणत्याही कामात लक्ष लागत नसेल किंवा मग काम करत असताना प्रत्येक वेळी तुमचे लक्ष हटत असेल तर तुमच्या शरिरात एकाग्रतेची अर्थात लक्ष केंद्रित करण्याची कमतरता असू शकते. याचे कारण, ओमेगा-3 ची कमतरता हे देखील असू शकते.

तसेच, अक्रोड आणि पालेभाज्यांचे जास्त सेवन केल्यानेही शरीराला हवे असलेले ओमेगा ३ पोषक तत्व मिळते.

ओमेगा-३ असलेले मांसाहारी पदार्थ

माशांमध्ये पुरेशी ओमेगा-३ फॅट असते. यासाठी सॅल्मन, मॅकेरल, ट्यूना, सार्डिन इत्यादी फॅटी मासे खाऊ शकतात. तर अंडी हा देखील ओमेगा ३ चा मोठा सोर्स आहे.

ओमेगा ३ कॅप्सुल

ओमेगा ३ घटक मिळावे यासाठी कॅप्सुलही उलपब्ध आहेत. शरीरासाठी आवश्यक असणारी विटामिंस आणि मिनरल्स हे ओमेगा ३ मल्टीविटामिन कॅप्सूल मोठ्या प्रमाणात पुरवू शकतात.

शरीरातील रोगप्रतिकारशक्ती आणि उर्जा वाढवण्यास देखील यांची भरपूर मदत होते. तथापि ओमेगा ३ कॅप्सूल यांचे सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT