Viral Video Dog and Cat esakal
लाइफस्टाइल

Viral Video : माजंरीला पाहण्यासाठी दोन पायांवर उभा राहिला कुत्रा

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.

आजकाल सोशल मीडियावर (Social Media) एकापेक्षा एक व्हिडिओ (Viral Video) पाहायला मिळतात. ज्यांनी कुत्रा (Dog) आणि मांजर (Cat) एकत्र पाहिलेले आहेत, त्यांच्यासाठी हे आश्चर्यकारक ठरू शकते. कारण, मांजरीला पाहिल्यानंतर कुत्रे लगेच त्यांना पळवतात. कुत्रा आणि मांजर हे मित्रासारखे एकत्र राहतात हे फार कमी वेळा पाहायला मिळतं. मात्र सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही विश्वास बसणार नाही. जेव्हा जेव्हा एखादा नवीन शेजारी राहायला येतो, तेव्हा तेव्हा आपण एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. या व्हिडिओमध्येही कुत्रा आणि मांजर यांच्यातही असंच काहीसं दिसून आलं.

नेक्स्टडोर द्वारा इन्स्टाग्राम (Instagram) पेजवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये कुत्रा आणि दोन मांजरींमध्ये एक अनोखा प्रकार दिसून येत आहे. एक माणूस आपल्या कुत्र्यासोबत बाल्कनीत उभे राहून बाहेर पाहत आहे, हे या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे. आपण पाहू शकता की कॅमेरा स्क्रीनच्या डाव्या बाजूला पॅन करतो आणि कुत्रा आपल्या नवीन शेजाऱ्याकडे पाहत आहे. बाल्कनीमध्ये दोन मांजरीही दिसत आहेत. असं वाटतयं की, तिघंही एकमेकांना समजून घेण्यासाठी स्कॅनिंग करत असल्याचं दिसतंय. त्यांच्यात मैत्री होऊ शकते का,हे पाहावं लागेलं.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्यात लिहिले आहे की, "जेव्हा नवीन शेजारी येतात तेव्हा असे काहीतरी दिसून येते." कॅप्शनमध्ये तीन हार्ट इमोजी आणि हसऱ्या चेहऱ्यांनी कॅप्शन पूर्ण केला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता आणि आतापर्यंत 30 हजार हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. एका इन्स्टाग्राम युझरने कमेंट केले, "हा हा हा हा, छोट्या काळ्या मांजरीचा चेहरा पाहण्यासारखा आहे. हा हा हा हा...' दुसऱ्या यूजरने लिहिले, 'मी खरंच मोठ्याने हसलो!' या गोंडस कुत्र्याबद्दल आणि त्याच्या नव्या कॅट मित्रांबद्दल तुमचे काय विचार आहेत?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

Pune News : खासगी ट्रॅव्हल्स बसेसना पुणे शहरात नवे नियम लागू, नवीन मार्गांची अंमलबजावणी सुरू

SCROLL FOR NEXT