Vitamin D esakal
लाइफस्टाइल

Vitamin D : उन्हात कितीवेळ बसल्यावर Vitamin D पुरेपुर मिळतं? याचा कधी विचार केलाय का?

आजकाल अनेक लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने त्रस्त आहेत

Pooja Karande-Kadam

Vitamin D :

आपल्या सर्वांना माहित आहे की सूर्यप्रकाश आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे. यातून व्हिटॅमिन डीचा पुरवठा होतो. उन्हाळ्यात लोक सूर्यप्रकाशापासून दूर पळतात. त्याच वेळी, लोक हिवाळ्याच्या दिवसात सूर्य प्रकाशात बसतात. आपण सुर्याच्या कोवळ्या प्रकाशात राहील्याने व्हिटॅमिन डी मिळते.

आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी व्हिटामिन डी देखील आरोग्यासाठी खूप महत्वाचे मानले जाते. त्याच्या कमतरतेमुळे हाडे, रक्तदाब, दात आणि स्नायूंच्या आरोग्यावर परिणाम होतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. थकवा, दुःख आणि तणाव वाढू लागतो. आजकाल अनेकजण या जीवनसत्वाची कमतरता दूर करण्यासाठी गोळ्या घेण्यास सुरुवात करतात.

पुरेपूर फायद्यासाठी कोणत्या वेळेत उन्हात बसावं?

सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी प्रत्येक ऋतूत सकाळी ८ ते ११ या वेळेत उन्हात बसणे फायदेशीर मानले जाते. उन्हाळ्यात 20 ते 25 मिनिटे आणि हिवाळ्यात दोन तास सूर्यस्नान करणे फायदेशीर मानले जाते. यावेळी, शरीर विटामिन डी मुबलक प्रमाणात शोषून घेते.

जाणून घ्या सूर्यप्रकाशाचे फायदे

सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवल्याने अनेक फायदे होतात. त्यात व्हिटॅमिन डी सर्वात जास्त आढळते. आजकाल अनेक लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने त्रस्त आहेत. सूर्यप्रकाशामुळेही आपले शरीर ऊर्जावान राहते.

सूर्यप्रकाशापासून शरीराला UVA प्राप्त होतो. त्यामुळे आपला रक्तप्रवाह सुधारतो. याशिवाय रक्तातील ग्लुकोजची पातळी सुधारते.

जर तुम्ही झोपेच्या समस्यांशी झुंज देत असाल तर सूर्यप्रकाश तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. हे तुम्हाला गाढ झोप देण्यासाठी उपयुक्त आहे. सूर्यप्रकाशात मेलाटोनिन नावाचे हार्मोन असते. ज्यामुळे गाढ झोप येण्यास मदत होते.  

शरीराला व्हिटॅमिन डी किती आवश्यक आहे?

दात, हाडे आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी शरीराला आवश्यक प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळणे आवश्यक आहे. शरीरातील कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिटॅमिन डी जबाबदार आहे. एका निरोगी व्यक्तीला एका दिवसात 37.5 ते 50 mcg व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते. तर वाढत्या मुलांना दररोज किमान 25 mcg आवश्यक असते.

हे एक पोषक तत्व आहे जे चरबीमध्ये विरघळते. त्यात जीवनसत्त्वे D1, D2 आणि D3 असतात. त्वचेचा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येताच आपोआप व्हिटॅमिन डी तयार होण्यास सुरुवात होते. गाईच्या दुधापासून व्हिटॅमिन डी कसे मिळवायचे ते आहे. (Vitamin D)

गाईचे दूध

व्हिटॅमिन डीच्या स्त्रोताबद्दल बोलायचे तर सूर्यप्रकाशाव्यतिरिक्त, गाईचे दूध देखील फायदेशीर मानले जाते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कमी फॅट असलेल्या दुधाऐवजी फुल क्रीम दूध प्यायल्याने जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम मिळते.

दही

दही खाल्ल्याने व्हिटॅमिन डीची कमतरताही पूर्ण होते. दह्याचे नियमित सेवन करणे अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे केवळ व्हिटॅमिन डीचा पुरवठा होत नाही. उलट शरीराला अनेक पोषक तत्वे मिळतात.

संत्र्याचा रस

संत्र्याचा रस, संत्रा आणि गोड लिंबाचा रस देखील व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत मानला जातो. ताज्या संत्र्याचा रस नियमितपणे प्यायल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होते. हे आरोग्यासाठी इतर अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Youth Congress Protest in Karad Against Sanjay Gaikwad : शेतकऱ्यांच्या वक्तव्याचा निषेध; कऱ्हाडमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या पुतळ्याला मांसाचे तुकडे अडकवत युवक काँग्रेसचे आक्रमक आंदोलन

Sakal Impact : 'सकाळ' इम्पॅक्ट; एमपीएससी गैरव्यवहार चौकशीला अखेर मुहूर्त, १६ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आवाहन

MPSC Student : आर्थिक कोंडीमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी धरली गावाची वाट; अभ्यासिका पडल्या ओस?

Pattankodoli Birdev Yatra Farande Baba Bhakanuk : राज्यासह केंद्रात राजकीय उलथापालथ होईल, देशात आंदोलने होतील; पट्टणकोडोली फरांडे बाबांची भाकणूक उत्साहात संपन्न

Diwali Water Supply Update in Pune : दिवाळीत पुणेकरांना मोठा दिलासा; ५ नोव्हेंबर रोजीची गुरुवारची पाणी कपात रद्द, सुरळीत पाणीपुरवठा होणार

SCROLL FOR NEXT