Cleaning Tips esakal
लाइफस्टाइल

Cleaning Tips : 'या' टिप्सनं Washing Machine करा झटपट स्वच्छ

रोज रोज पाण्याचा किंवा कळकट कपड्यांचा संबंध येत असल्याने मशिनही खराब होतं.

सकाळ डिजिटल टीम

Home Remedies For Cleaning Washing Machine: मशिन व्यवस्थित कोरडं होऊ न देता लगेच झाकण लावल्याने त्यावर बुरशीही येते. कपडे स्वच्छ धुणारं वॉशिंग मशिनच कधी कधी एकदम कळकट होऊन जातं. म्हणूनच कमी मेहनतीत ते कसं झटपट स्वच्छ करायचं याचे हे काही खास उपाय.

टॉप लोड वॉशिंग मशिन स्वच्छ करण्याचे उपाय

१. व्हिनेगरच्या मदतीने वॉशिंग मशिन अगदी नव्यासारखे चमकवता येते. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी मशिनला हॉट टेम्परेचरवर सेट करा.

यानंतर मशिनमध्ये गरम पाणी टाका. त्यात साधारण ५ ते ६ टेबलस्पून एवढं व्हाईट व्हिनेगर टाका. मशिन खूप जास्त घाण झालं नसेल तर व्हिनेगर टाकणं पुरेसं आहे. पण जर मशिन खूपच काळवंडलं असेल तर मात्र व्हिनेगरसोबतच त्यात साधारण २ ते ३ टेबलस्पून एवढा बेकिंग सोडाही टाकावा.

२. हे दोन्ही टाकल्यानंतर ५ ते १० मिनिटांसाठी मशिन सुरू करा. त्यानंतर पुढचा एक तास मशिन झाकण लावून बंद ठेवा. त्यानंतर पुन्हा ५ मिनिटांसाठी मशिन चालू करा आणि नंतर मशिनमधले हे पाणी काढून टाका. पाणी निघून गेल्यानंतर एका कोरड्या सुती कपड्याने मशिन स्वच्छ पुसून घ्या.

३. सेमी ऑटोमॅटीक मशिन

जर तुमचे मशिन सेमी ऑटोमॅटीक प्रकारातले असेल किंवा ऑटोमॅटीक मशिन बाहेरच्या बाजूने स्वच्छ करायचे असेल तर ही पद्धत वापरू शकता.

यासाठी साधारण एक मग पाणी घ्या. त्यात ३ ते ४ टेबलस्पून व्हिनेगर आणि २ ते ३ टेबलस्पून बेकिंग सोडा टाका. हे मिश्रण मशिनवर आतून बाहेरून शिंपडा. ५ ते ७ मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. रबरच्या घासणीने घासूनही तुम्ही स्वच्छ करू शकता. पण खूप जोरजोरात घासू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT