Fashion Tips  esakal
लाइफस्टाइल

Fashion Tips : आउटफीटनुसार योग्य ते सॉक्स घाला, नाहीतर इंप्रेशन होणार...

कोणते मोजे कधी घालावे याबद्दल माहिती आहे का?

सकाळ डिजिटल टीम

पायमोजे थंडीच्या वातावरणात सर्वात महत्वाची गोष्ट आहे.. यामुळे आपलं थंडीने संरक्षण होतं. खरतर आजकाल फक्त थंडीतच पायमोजे वापरले जातात असं नाही; १२ महीने मोजे सध्या वापरले जातात, अर्थात ही काळाची गरज आहे.. पण कोणते मोजे कधी घालावे याबद्दल माहिती आहे का? खरंतर मोज्यांमध्ये एवढे प्रकार येतात हेच बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

गंमत अशी की वेगवेगळे फॅब्रिक तर यात असतातच, पण या मोज्यांचं त्यांच्या आकारानुसार वर्गीकरण केलं जातं हे माहिती आहे का? कोणते मोजे नक्की कधी घालावेत हा प्रश्न सगळ्यांना असतोच.. कारण अनेकदा आपण केसापासून पर्यन्त अप-टू-डेट असतो पण पायाच्या विचित्र मोज्यांमुळे आपला लुक खराब होऊ शकतो. असं होऊ नये म्हणून या टिप्स फॉलो कर

मोज्यांचे प्रकार:

मोज्यांचे अनेक प्रकार आहेत, आधी ते समजून घ्या, एकदा का याचे प्रकार समजले की मग हा त्रास तितका जाणवणार नाही.

no show socks tips

१. नो शो सॉक्स: अनेकदा आपण शूज किंवा मोजडी घातल्यावर पायातून सॉक्स बाहेर दिसता आहेत असं होतं ना? शिवाय मुलींच्या अॅंकल लेंथ जीन्स, शॉर्ट ड्रेसेस, पलाझो यावरती रेग्युलर सॉक्स खूप खराब दिसतात. त्यासाठी असे सॉक्स गरजेचे आहेत.

extra low cut socks

२. लायनर किंवा एक्स्ट्रा लो कट सॉक्स: सहसा स्पोर्ट्स शूज घालणार असाल तर हे सॉक्स परफेक्ट आहेत. तुम्ही डांस क्लास, जिम, रनिंग ट्रॅकवर सुद्धा असे सॉक्स घालू शकतात, महिला त्यांच्या लेगिन्स खाली सुद्धा असे सॉक्स घालू शकतात.

regular socks

३. रेग्युलर किंवा अँकलेट सॉक्स: साधारण आपल्या टाचेपर्यन्त पोहोचणारे सॉक्स म्हणजे हे रेग्युलर सॉक्स. आपल्या कोणत्याही ड्रेसवर आणि फुट वेअरवर परफेक्ट जातील असे हे सॉक्स आहेत.

mid calf socks

४. मिड काल्फ सॉक्स: शाळेतल्या मुलांना, स्पोर्ट पर्सन्सला आणि ट्रेकर्सला हे सॉक्स परफेक्ट आहेत, यांची उंची गुढघ्याच्या खालपर्यंत असते. अगदीच थंडी वाढली आहे त्यामुळे थंडी वाजू नये म्हणूनही तुम्ही असे सॉक्स घालू शकतात. हे सॉक्स फॉर्मल्स मध्येही घालता येतील.

over calf socks

५. ओव्हर काल्फ सॉक्स: आपला गुढघा पूर्णपणे झाकला जाईल अशी या सॉक्सची रचना आहे. हे सॉक्स सहसा शाळांमध्येच वापरले जातात, तुम्ही आपल्या ट्रेकिंगसाठीही हे सॉक्स वापरू शकतात, याने तुम्हाला खरचटणार नाही आणि कव्हरेज मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT