Best Wedding Shopping places in Mumbai
Best Wedding Shopping places in Mumbai esakal
लाइफस्टाइल

Wedding Shopping : लग्नाची खरेदी इथंच झाली पाहिजे; ब्रँडेड पण स्वस्त बस्ता मुंबईतल्या फक्त याच ठिकाणी मिळेल!

Pooja Karande-Kadam

Wedding Shopping : लग्नाच्या खरेदीचा गोंधळ वेगळाच असतो.  पुर्वीच्या काळात घरातील चिल्ल्या पिल्ल्यांसह वृद्ध लोकांना सोबत नेऊन खरेदी केली जात होती. काही लग्नात वधु वराचे कपडे एकाच ठिकाणी घेतले जायचे. तर काही ठिकाणी वेगवेगळी शॉपिंग केली जाते.

लग्न ठरल्यावर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ‘लग्नाचे शॉपिंग’. प्रत्येक वधू आणि वराच्या लग्नसोहळ्यातील लुक आणि इतर गोष्टींबाबत खास कल्पना असतात.

सध्या तर तीन-चार दिवशी लग्नसोहळा रंगतो. साखरपुडा, मेंदी, हळद, संगीत, लग्नाच्या दिवशी असणारे विविध विधी आणि लग्नाचं रिसेप्शन, पुजा अशा अनेक कार्यंक्रमांसाठी निरनिराळे पेहराव आणि दागिने परिधान केले जातात.

वधू आणि वर या सर्व सोहळ्यात सेंटर ऑफ एटरॅक्शन असल्यामुळे त्यांचा लुक सर्वाधिक आकर्षक असणे गरजेचे आहे.लग्नाची खरेदी म्हटली की प्रामुख्याने येवला, कोल्हापूर, नागपूर, पुणे आणि मुंबई येथे प्रामुख्याने खरेदी केली जाते. मुंबईतल्या काही मार्केटबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

लग्नातील कपडेच नाहीतर, दागिने घ्यायचे असतील मुंबईमधील 'झवेरी बाजार' येथे सोन्यापासून जर्मन सिल्व्हरपर्यंत, पारंपरिक ते फॅशनेबल सगळ्या प्रकारचे दागिने मिळतात. कपड्यांसाठी 'क्रॉफर्ड मार्केट', 'मनिष मार्केट', 'भुलेश्वर', 'मंगलदास मार्केट' हे सर्वोत्तम पर्याय आहेत. पेहराव, दागिने, मेकअप, पादत्राणे, गिफ्ट, भांडी सगळं काही या मार्केटमध्ये मिळतं.

दादर (wedding shopping in Dadar)

मुंबई जगणं सोप्प करते. कारण तिथे जसे एकदम हायफाय दुकाने असली. ब्रॅंडेड सामान असले तरी मुंबईपेक्षा स्वस्त काहीच नाही असं देखील म्हणतात. त्याचं कारण असं की, मुंबईत असलेले अनेक मार्केट्स होय. दादर वेस्टमध्ये अशी अनेक दुकाने तुम्हाला मिळतील. जीथे लग्नाचा बस्ता स्वस्तात मिळू शकतो.

या मार्केटमध्ये सुरत, राजस्थान इथल्या फॅक्टरीतून माल भरला जातो. त्यामुळे इथे होलसेल साड्यांचे रेट कमी आहेत. इथे तुम्हाला साडीज ४० रूपयांपासून अगदी ५० हजारापर्यंच्या साड्या मिळतील. व्हरायटी आणि क्वालिटी या दोन्ही गोष्टी इथल्या साडीच्या धाग्यांमध्ये पहायला मिळतील. तर नवरीच्या खरेदीसाठी म्हणत असाल तर १५०० ला शालू मिळेल.

मंगलदास मार्केट

मुंबईतील मंगलदास मार्केट हे लग्नाच्या खरेदीसाठी अनेकांच्या पहिल्या पंसतीची जागा आहे. मंगलदास मार्केटमध्ये लग्नासाठी लागणाऱ्या विशेष रेशीम, लेस, ब्रोकेड आणि मखमली फॅब्रिक्सचे पोशाख आपल्याला माफक दरात मिळातात. इथून आपल्याला लग्नात उठून दिसता येईल अशा सुंदर पोशाख निवडण्यासाठी बरेच पर्याय मिळतात.

भुलेश्वर मार्केट (Bridal Market in Bhuleshwar)

मंगलदास मार्केटपेक्षा भुलेश्वर मार्केटमध्ये आपल्याला अधिक गर्दी पाहायला मिळेल. याचं कारण म्हणजे महिलासांठी लेहेंगा, साड्या, शूज, दागिने हे इथे अव्वल दर्जाचे मिळतात.

त्याच बरोबर लग्नात लागणारी पूजेची थाळी देखील स्वस्त दरात विकणारी दुकाने इथे आहेत. इथल्या दुकांनामध्ये स्टिचर्ड फॅब्रिक प्रति मीटर २०० रूपयांपर्यंत मिळते तसेच इथे सुरेख अशा तयार दागिन्यांचीही विक्री होते.

जुहू तारा रोड

आपल्याला जर लग्नाच्या खरेदीत हात सैल सोडायचा असेल तर हा आपण विलेपार्ले पश्चिमेला जुहू तारा रोडवर खरेदीसाठी जाऊ शकता.. रितु कुमार, फाल्गुनी आणि शेन मयूर, मसाबा, मनीष अरोरा अशा अनेक फॅशन डिझायनर्सचे स्टोअरर्स जुहू तारा रोडवर आहेत.या भागात किमया आणि अझा सारखे बुटीक देखील आहेत, जे डिझाइनर कपड्यांचे विषेश संग्रह विकतात.

नटराज मार्केट

मुंबई उपनगराच्या मालाड पश्चिम स्थानकाच्या शेजारी असलेलं नटराज मार्केट हे महिलांच्या लेहंगा, ड्रेस मटेरील, कॉस्मेटीक आणि एर्मोडरीच्या खरेदीसाठी विषेश ओळखलं जातं. कोणत्याही सणाला इथे खरेदीसाठी लोकांची झुंबड उडालेली असते. इथे लग्न बस्त्याची खास सोय आहे.

हिंदमाता मार्केट

लग्नाचा ड्रेस, लेहेंगा, साड्या आणि दागदागिन्यांसाठी हिंदमाता मार्केट लग्नाची खरेदी करण्यासाठी लोकांची पहिल्या पसंतीची जागा आहे.आहे.

हिंदमाता मार्केटमध्ये परवडणारी स्टँडअलोन फॅब्रिक स्टोअर्स, बुटीक आणि अनेक मोठे शोरूम आहेत ज्यात तुम्हाला बजेट मध्ये लग्नाच्या कपड्यांची खरेदी करता येते. लग्नाची साडी खरेदी करण्यासाठी हे सर्वात चांगलं मार्केट आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या किंमतीच्या आणि चांगल्या प्रतिच्या साड्या सहजपणे मिळतात.

क्रॉफर्ड मार्केट

 जर तुम्ही रेडीमेड पूजेची थाळी, कळश, भेटवस्तू आणि सजावटीच्या वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर क्रॉफर्ड मार्केट आणि त्याच्या शेजारची गल्ली, लोहार चाळ ही खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. सर्व प्रकारच्या लग्नाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी इथली सक्सेस कॉर्नर आणि न्यू बॉम्बे बॅग कॉर्नर ही ठिकाणं लोकांच्या पसंतीची आहेत.

मंगलदास मार्केट (Wedding shopping Mangaldas Market)

मुंबईतील सर्वोत्तम खरेदी ठिकाणांमध्ये मंगलदास मार्केटचा समावेश होतो. या ठिकाणी अ‍ॅक्सेसरीज, कपडे, हाताने बनवलेल्या वस्तू आणि दागिन्यांची मोठी रेंज बघायला मिळते.

येथे तुम्हाला फॅब्रिक्ससह फॉर्मल वेअर आणि एथनिक कपड्यांचेदेखील मुबलक पर्याय मिळतील. हे मार्केट कायम लोकांच्या गर्दीने गजबजलेलं असतं.

लिंकिंग रोड

वांद्र्यातील लिंकिंग रोडवर स्टोअर्स, शॉपिंग मॉल्स, डिझायनर बुटिक, फ्ली स्टोअर्स आणि रस्त्यावरील विक्रेत्यांची एकाच ठिकाणी मांदियाळी बघायला मिळते. त्यामुळे तुमचं बजेट काहीही असो, तुम्हाला लिंकिंग रोडवर नक्कीच काहीतरी खरेदी करता येईल. तुम्ही कार्टर रोड किंवा वांद्रे बँडस्टँड जवळील फुड जॉईंट्समध्ये जाऊन रुचकर खाद्यपदार्थांची चवदेखील घेऊ शकता.

हिल रोड

वांद्रे येथील हिल रोड हे मुंबईतील सर्वोत्तम शॉपिंग ठिकाणांपैकी एक आहे. या ठिकाणी वधु वरांच्या कपड्यांच्या अनेक व्हरायटी आहेत. याहस इथे दागिने, अंतर्वस्त्र आणि बरेच काही खरेदी करता येते.

आकर्षक सवलतीत रेडिमेड कपडे मिळव्यासाठी येथी सोना शॉपिंग सेंटरला भेट देता येईल. हे ठिकाण एल्को मार्केट आणि रस्त्यावरील दुकानांमध्ये विभागलं गेलं आहे.

क्रॉफर्ड मार्केट

क्रॉफर्ड मार्केट हे मुंबईतील आणखी एक टॉप शॉपिंग डेस्टिनेशन्सपैकी एक आहे. या मार्केटमध्ये फॅब्रिक्स, कपडे, मसाले, फ्रेश प्रॉडक्ट्स, विविध उपकरणं, शूज, पार्टी सप्लाय, सौंदर्यप्रसाधनं आणि भेटवस्तूंसह शेकडो प्रकार मिळतात. इथे लग्न बस्ता, होलसे साडीज, मेन्सवेअरमध्ये अनेक व्हरायटी पहायला मिळतील.

लग्नाच्या इतर ऍक्सेसरीज इथे मिळतील

'गिरगाव' म्हणजे मिनी पुणे असे म्हणतात तिथे तुम्हाला 'मोत्याचे' उत्तम प्रतिचे 'दागिने' मिळतील. मोत्याच्या मुंडावळ्या, तनमणी, चिंचपेटी, गहू तोडे म्हणजे खास वधुसाठी मोत्यांच्या दागिन्यांची खरेदी गिरगावात करु शकता.

सध्या हळदीला फुलांचे दागिने घालतात ते सुद्धा गिरगाव किंवा क्रॉफर्ड मार्केटमध्ये मिळतात. लग्नाच्या पत्रिका तयार करण्यासाठी गिरगाव हा उत्तम पर्याय आहे.

चर्नीरोड स्टेशनला उतरल्यानंतर लग्नपत्रिका तयार करणारी अनेक दुकाने दिसतील. तसं दादर आणि बोरीवली येथेही लग्नाची पत्रिका तयार करून मिळते. सध्या ठाण्यात सुद्धा कलामंदिर, कलानिकेतन, वस्त्रम, रुपम येथे साड्यांची खरेदी करु शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT