Weight Control Tips  esakal
लाइफस्टाइल

Weight Control Tips : पिझ्झा, जिलेबी खाऊनसुद्धा फिट कसं रहायचं? मिलिंद सोमणने सांगितली सोपी ट्रिक

मिलिंद सोमण हा चिप्स, पिझ्झा, बर्गर यांसारखे चरबीयुक्त पदार्थ खातो. तरीसुद्धा तो फोर फिट कसा असतो?

साक्षी राऊत

Weight Control Tips : फिटनेस फ्रिकच्या लिस्टमध्ये चर्चेत असणारं एक नाव म्हणजे मिलिंद सोमण. मिलिंद सोमणचे वय सध्या 57 वर्ष आहे. मिलिंद एवढा फिट कसा आहे याबाबत तो कायम सोशल मीडियावर शेअर करत असतो. एका इंटरव्ह्यूमध्ये मिलिंदने वजन नियंत्रित ठेवण्याबाबत महत्वाची गोष्ट सांगितली होती. मिलिंद सोमण हा चिप्स, पिझ्झा, बर्गर यांसारखे चरबीयुक्त पदार्थ खातो. तरीसुद्धा तो फोर फिट कसा असतो? असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल. चला तर जाणून घेऊया सीक्रेट

मिलिंद सोमणचा फिटनेस मंत्र

फिटनेसच्या बाबतीत मिलिंद अनेक लोकांसाठी आदर्श ठरतो. सोशल मीडियावर धावण्याचे, चालण्याचे आणि एक्सरसाइज करतानाचे अनेक व्हिडिओ तुम्ही बघितले असतील. काही दिवसापूर्वी इंडिय डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत मिलिंदने तो सगळं काही खाऊन फिट कसा राहते याबाबत सांगितले.

मिलिंद सांगतो की, मी एका एक पूर्ण पपई किंवा खरबूज एकटाच खाऊ शकतो. सकाळी रिकाम्या पोटी मी फळे खातो. मिलिंद सांगतो की तो अर्ध्या तासात ३-४ किलो फळे खाऊ शकतो.

मिलिंदला जिलेबी आवडते

मिलिंदला चीट मीलबद्दल विचारले असता त्याने उत्तर दिले, मी कधीच चीट करत नाही. मला आवडते ते सगळं मी खातो. मला जिलेबी आणि काजू कतली आवडते. माझी बायको मला जेवायला वाढते. मिलिंदने सांगितले की, मी आहारात सर्वकाही खातो.

पुढे तो म्हणतो ज्या पदार्थांचा तुम्हाला फायदा होतो त्याचे प्रमाण वाढवा. तर जे पदार्थ तुम्हाला नुकसान देतात ते खाण्यातून वगळा किंवा त्याचे प्रमाण कमी करा. त्यामुळे मी चिप्स, बर्गर, पिझ्झा सगळं काही खातो. हे सगळं मी कमी प्रमाणात का होईना पण मी खातो . फळे आणि भाज्यांचा आहारात रोजच्या आहारात समावेश करून घ्या. (Exercise)

मिलिंद रोज एक्सरसाइज करतो

मिलिंद सोमण नियमित एक्सरसाइज करतो. काही दिवसांपूर्वी त्याने एक व्हिडिओ क्लिप शेअर केली होती ज्यामध्ये तो डेहराडूनच्या रस्त्यांवर चप्पल किंवा जोडे न घालताना धावताना दिसतोय. तो त्याच्या बायकोसोबतही वर्कआउटचे व्हिडिओ पोस्ट करत असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honey Trap Miraj : बुलाती है मगर जानेका नहीं! सोशल मीडियाचा नाद लावून पोरं बाद करणारी टोळी, मिरजेत फोटो, व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; कोल्हापूर कनेक्शन

Jalna Crime: पोलिस रेकॉर्डवरील एकाचा खून; जालन्यात थरार, जमिनीच्या वादातून चौघांकडून सशस्त्र हल्ला

नेते अन्‌ कार्यकर्त्यांनो सावधान ! 'साेलापुरात बाईक रॅली काढाल तर गुन्हा दाखल'; पोलिस आयुक्तांचे काय आहेत नियम?

Solapur News: 'साेलापूर जिल्ह्यातील ७८ हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित'; शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाई मिळेना..

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

SCROLL FOR NEXT