Weight Gain Tips  esakal
लाइफस्टाइल

Weight Gain Tips : बारीक लुकड्या शरीराला डौलदार बनवा, वजन वाढवायला असं करा केळीचं सेवन!

केळीचे पौष्टिक गुणधर्म कोणते?

Pooja Karande-Kadam

Weight Gain Tips :  चांगला आणि पौष्टिक आहार आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, चुकीच्या पद्धतीने पौष्टिक पदार्थांचे सेवन करणेही हानिकारक ठरू शकते. केळी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ज्यांना वजन वाढवायचे आहे किंवा बॉडी बिल्डिंग करायची आहे अशा दुबळ्या लोकांनी केळीचे सेवन करावे. चांगले व्यक्तिमत्व, टोन्ड बॉडी आणि मजबूत स्नायू यासाठी केळी खाण्याची शिफारस केली जाते.

शारीरिक तंदुरुस्ती संतुलित करण्यासाठी केळी देखील फायदेशीर ठरू शकते. केळीमध्ये अनेक गुणधर्म आढळतात, जे रोगांपासूनही संरक्षण देतात. पण जर तुम्ही तुमचे शरीर मजबूत करण्यासाठी केळीचे सेवन करत असाल तर ते योग्य पद्धतीने करा.

चुकीच्या पद्धतीने केळी खाल्ल्याने शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात आणि ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. चला जाणून घेऊया केळीचे योग्य सेवन कसे करावे आणि केळी खाताना कोणत्या चुका करू नयेत.

केळीचे पौष्टिक गुणधर्म

रोज एक केळी खाल्ल्याने तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवता येते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. केळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी6, थायामिन, रिबोफ्लेविन असते. केळीमध्ये पाणी, प्रथिने, कार्बोहायड्रेटचे प्रमाणही आढळते.

केळी खाण्याचे फायदे

अशक्तपणा - केळी खाल्ल्याने पोट लवकर भरते. जर तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी केळी खाल्ल्यानंतर बाहेर गेलात तर दुपारच्या जेवणापर्यंत पोट भरलेले राहते आणि ऊर्जा टिकून राहते.

पचन - केळीच्या सेवनाने पचनाच्या समस्या दूर होतात. केळीमध्ये आढळणारे स्टार्च पचनसंस्थेसाठी चांगले असते. यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्याही दूर होऊ शकते.

वजन- केळीमध्ये आढळणारे फायबर आणि स्टार्च पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते. त्यामुळे भूक लागत नाही आणि वजनही नियंत्रणात राहते.

केळी खाण्याचे तोटे

बद्धकोष्ठता - ज्यांना बद्धकोष्ठतेची तक्रार आहे त्यांनी केळीचे सेवन टाळावे.

केळी खाण्याची योग्य वेळ - केळी खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत आहे. सकाळच्या नाश्त्यात केळी खाऊ शकता. केळी कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये. रात्री झोपण्यापूर्वी केळी खाणे टाळावे. रात्री केळी खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकता. यामुळे खोकल्याची समस्या उद्भवू शकते. यासोबतच पोट जास्त भरल्यामुळे निद्रानाशाची तक्रारही होऊ शकते.

साखर पातळी - साखरेच्या रुग्णांसाठी केळीचे सेवन हानिकारक ठरू शकते. केळ्यामध्ये नैसर्गिक साखर असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

केळी खाण्याची योग्य पद्धत

केळीसोबत दुधाचे सेवन करू नये. आयुर्वेदात केळी आणि दुधाचे मिश्रण निषिद्ध असल्याचे सांगितले आहे. डॉक्टरांच्या मते, यामुळे पचनक्रियेवर परिणाम होऊन निद्रानाश होऊ शकतो.

केळी आणि तूप एकत्र सेवन करता येते. सकाळी नाश्त्यात केळी आणि दही मिसळून खाऊ शकता. वर्कआउटच्या आधी किंवा नंतर केळी आणि दही खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT