Weight Loss Tips esakal
लाइफस्टाइल

Weight Loss Tips : वजन इतकं वाढलंय की कपडे बसेनासे झालेत? रात्रीच्यावेळी हे पदार्थ खायचे बंद करा, फरक जाणवेल

तुम्ही रात्रीच्या जेवणात तळलेले पदार्थ खाणे बंद करावे

सकाळ डिजिटल टीम

Weight Loss Food :

सध्या वाढलेलं वजन हा चिंतेचा विषय बनला आहे. प्रत्येकजण वाढलेलं वजन कमी कसं करायचं याबद्दल प्रयत्न करताना दिसतो. वाढलेल्या वजनामुळे आपण बेडौल तर दिसतोच पण अनेक असाध्य आजाराही आपल्यला होतात. त्यामुळेच लोक वजन कमी करण्यासाठी कठिण परिश्रम करतात. (Weight Loss Tips)

लोक डायट फॉलो करतात आणि पण एक महत्त्वाची गोष्ट ते विसरतात. की, आपण रात्रीच्यावेळी काही गोष्टींचे सेवन टाळले तर आपले वजन झपाट्याने कमी होऊ शकते. असे कोणते पदार्थ आहेत जे आपण टाळले तर जास्त फरक पडतो हे पाहुयात.  (Weight Loss)  

तळलेले पदार्थ

तुम्ही रात्रीच्या जेवणात तळलेले पदार्थ खाणे बंद करावे. साधे जेवण असले तरी पापड खाण्यात येतात. आणि बाहेरच्या जेवणात तर हमखास तळलेले पदार्थ आपण खातो. फ्रेंच फ्राईज, स्प्रिंग पोटॅटो आणि बऱ्याच पदार्थांवर आपण ताव मारतो. त्यामुळे दिवसभरच नाहीतर रात्रीच्या वेळीही तेल आणि आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा.

आईस्क्रीम

खाने के बाद कुछ मिठा हो जाये असे म्हणत लोक हमखास गोड खातात. त्यातही उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा सर्वच सिझनमध्ये लोक आईस्क्रीम खातात. पण रात्रीच्या जेवणानंतर आईस्क्रीम खाल तर तुमचे वजन वाढते. कारण, जेवणानंतर आपण झोपतो खाल्लेल्या गोष्टीचे पचन होत नाही.

फ्रोझन फूड

जे पदार्थ वर्षभर मिळत नाहीत म्हणून ज्या त्या सिझनमध्ये साठवले जातात, त्यांना फ्रोझन फूड म्हणतात. फ्रोझन फुड बनवण्यासाठी कोणताही पदार्थ घेऊन त्यावर प्रक्रिया करून तो बर्फात साठवला जातो. म्हणजे तो पदार्थ आहे असाच राहतो. असे पदार्थ बाजारात सहज उपलब्ध आहेत. ते खाल्ल्याने तुमचे वजन दुपट्टीने वाढू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: कर्जाच्या डोंगरामुळे तरुण शेतकऱ्याने दिला जीव

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT