Weight Loss Tea News Sakal
लाइफस्टाइल

Weight Loss Tea ‘हा’ चहा पिऊन वेटलॉस करणे होईल सोपे, इतरही मिळतील जबरदस्त फायदे

Gulacha Chaha Pinyache Fayde तुम्ही देखील साखरेच्या चहाचे सेवन करताय का? मग वेळीच व्हा सावध

सकाळ डिजिटल टीम

Jaggery tea benefits In Marathi : आपणही घरातल्या थोरामोठ्यांना साखरेऐवजी गुळाचा चहा पिताना पाहिलं असेल. कारण साखरेचा चहा आरोग्यासाठी हानिकारक असतो. या उलट गुळाचा चहा प्यायल्याने शरीरास अनेक लाभ मिळतात. 

गुळाच्या चहा प्यायल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते, शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते, चयापचयाची क्षमता देखील सुधारते. महत्त्वाचे शरीराचे वजनही नियंत्रणात राहते. चला तर जाणून घेऊया गुळाचा चहा पिण्याचे कोणकोणते फायदे आहेत? 

गुळातील पोषकघटक

100 ग्रॅम गुळामध्ये 383 कॅलरीज् असतात. तर 11 मिलीग्रॅम इतके लोहाचे प्रमाण असते. प्रथिने आणि फॅट्सचे प्रमाणे 0.1 मिलीग्रॅम, कॅल्शियमचे प्रमाण 85 मिलीग्रॅम आणि फॉस्फरसचे प्रमाण 20 मिलीग्रॅम इतके असते.

गुळाचा चहा पिण्याचे फायदे

  • उन्हाळ्यात आपण पाण्यामध्ये गूळ उकळून ते सिरप स्वरूपात पिऊ शकता. यामुळे उन्हाळी लागण्याची समस्या कमी होऊ शकते. शिवाय शरीराची रोगप्रतिकारकशक्तीही वाढते.  

  • मधुमेहग्रस्तांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गुळाचे सेवन करावे. नॅचरल स्वीटनर म्हणून आपण गुळाचा आहारामध्ये समावेश करू शकता.

  • गुळातील पोषणतत्त्वांमुळे पोटाशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळते. शिवाय शरीराचे वजनही नियंत्रणात राहते.

  • शरीरातील हिमोग्लोबिनची पातळीही वाढते. 

  • ज्या लोकांच्या शरीराचे वजन झपाट्याने वाढते, त्यांनी  गुळाच्या चहाचे सेवन केल्यास फायदेशीर ठरू शकते.  

  • गुळामुळे शरीराची चयापचयाची क्षमता सुधारते.  

  • ज्यांना पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचा त्रास आहे, त्यांच्यासाठीही गूळ खूप फायदेशीर आहे. यामुळे मासिक पाळी नियमित येण्यास मदत मिळते.

  • गुळामुळे शरीरातील हार्मोन्स देखील संतुलित करण्यास मदत मिळते.  

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT