Weight Loss Tips  esakal
लाइफस्टाइल

Weight Loss Tips :  कितीही प्रयत्न केले तरी ढेरी काय कमी होईना? फक्त एवढंच करा, फरक पडेल

सकाळी १ तासभर कपालभारती, सायकलिंग केल्यानेही वजन कमी होते

सकाळ डिजिटल टीम

 Weight Loss Tips :

मुलं असो वा म्हातारी माणसं ते एकवेळ कारल्याची गुळ घालून केलेली भाजी खातील. पण, दुधीच्या भाजीला अजिबात हात लावणार नाहीत. दुधीचा वापर साऊथ इंडियन पदार्थांसोबत दिल्या जाणाऱ्या सांबारमध्ये जास्त केला जातो. त्याने एक वेगळीच चव येते. पण तुम्हाला माहिती आहे का की, दुधी पाहून नाक मुरडणारे लोकही आजकाल दुधीचा वापर करून बारीक होऊ लागले आहेत.

होय, दुधीचा रस प्यायल्याने वजन झटक्यात कमी होते. असं आम्ही नाहीतर योगगुरू स्वामी रामदेव यांनी सिद्ध केले आहे. त्यांच्या अनेक कार्यक्रमात त्यांनी दुधीच्या रसाची महती सांगितली आहे. (Bottle Gaurd For Weight Loss)

दुधीचा रस घेतल्याने महिन्याभरात अनेक लोकांचे १० ते १५ किलो वजन कमी झाले असल्याचा दावा स्वामी रामदेव यांनी केला आहे. आपण त्यांनीच सांगितलेला हा दुधीचा फॉर्म्युला काय आहे हे पाहुयात.   

दुधी भोपळ्यात १२ टक्के पाण्याचे प्रमाण असून याची चव इतर भाज्यांपेक्षा निराळी असते. दुधी भोपळ्यात मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस प्रथिने असतात. नियमित व्यायाम, शारीरिक श्रमानंतर रोज १०० ग्राम दुधी भोपळ्याचा रस प्या, त्यामुळे पोट भरल्यासारखे राहते व भूक लागत नाही परिणामी वजन नियंत्रित राहते.

वजन कमी करण्यासाठी दुधी कशी खावी

दुधीचा रस

वजन कमी करण्यासाठी दुधीचा रस पिण्याचा सल्ला स्वामी रामदेव देतात. त्यांच्या मते, रोज दिवसाची सुरूवात आणि शेवट दुधी भोपळ्याचा रस पिऊन केली पाहिजे. तसेच, मधल्या वेळेतही याचे जमेल तसे सेवन करावे.

दुधीचा रस बनवताना हे लक्षात असुद्यात की, यामध्ये तुळस, कोथिंबीर, पुदिना, लिंबू घातला. तर त्याची चव अधिक वाढेल. आणि त्याने तुम्हाला अधिक फायदा होईल.

दुधीचे सॅलेड

तुम्ही दुधीच्या बियांचा भाग काढून त्याचे सॅलेड बनवू शकता. काकडी कोबीची यावर बारीक खिसून ते दहीसोबत खाऊ शकता.

दुधीची भाजी

जर तुम्ही पौष्टीक नाचणीची भाकरी केली असेल तर त्यासोबत दुधीची भाजी खाणे फायद्याचे ठरू शकते.

यासोबत सकाळी १ तासभर वजन कमी करण्यासाठी कपालभारती, सायकलिंग असे व्यायामही करू शकता. जर ही लाईफस्टाईल तुम्ही २ महिने पाळलीत तर तुम्हाला लगेचच परिणाम दिसायला लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले, १ लाख १५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Viral: पहिल्यांदा चावला तर १० दिवस तुरुंग; पुन्हा चावला तर आजीवन कारावास, भटक्या कुत्र्यांसाठी प्रशासनाचा अनोखा नियम

BMWने उडवलं, केंद्रीय अर्थ मंत्रालयातील उपसचिवाचा मृत्यू, पत्नी गंभीर; महिलेला अटक

IND vs PAK : टीम इंडियाचं वाकडं करू शकत नाही, म्हणून पाकिस्तानची ICC कडे तक्रार; तिथे कोण बसलाय हे ते बहुदा विसरलेत...

Pune Water Crisis : नळाच्या पाण्यात आढळल्या चक्क अळ्या; वैदूवाडी, आशानगरमध्ये महिलांकडून थाळ्या वाजवून संताप व्यक्त

SCROLL FOR NEXT