weight loss esakal
लाइफस्टाइल

Weight Loss Tips : द्राक्ष खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का?

द्राक्षांचं अती सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं!

सकाळ डिजिटल टीम

डायटवर भर देऊन तूम्ही वजन कमी करत असाल तर ते लवकर होणार नाही. डायट सोबतच व्यायामही तितकाच महत्वाचा आहे. वजन कमी करण्यासाठी लोक बर्‍याच गोष्टी खाणं सोडून देतात. पण आहार घेत असताना आपण विशेषत: फळांचे सेवन वाढवितो आणि मग विचार करतो की दुसर्‍या चदिवशी आपले वजन कमी होईल.

असे होत नाही कारण अशी काही फळे असतात ज्यामध्ये उच्च प्रमाणात कॅलरीज असतात. फळे भलेही नैसर्गिक असतात पण काही फळांचे आपण खूपच काळजीपूर्वक सेवन करायला हवे.

सध्या द्राक्षांचा सिझन सुरू आहे. त्यामूळे बाजारात टपोरी द्राक्ष पहायला मिळत आहेत. उन्हाळ्याच्या सिझनमध्ये शरीराला पाण्याची कमतरता भासू नये यासाठी द्राक्ष, कलिंगड खाण्याचा सल्ला आहारतज्ञ देतात. लोक वजन कमी करतानाही अशा फळांचे सेवन अधिक करतात. पण, द्राक्ष खाण्याचे दुष्परिणाम लोकांना माहितीच नाहीत.

वजनावर इफेक्ट होतो का?

जास्त द्राक्ष खाल्ल्याने लठ्ठपणा वाढू शकतो. द्राक्षे खूप गोड असतात. त्यात कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते. जास्त कॅलरी घेतल्याने वजन वाढते. द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन-के, थायमिन, प्रोटीन, फॅट, फायबर आणि कॉपर असतात. जास्त द्राक्षे खाल्ल्याने वजन वाढण्याचा धोका असतो.

द्राक्षातील साखर आपल्याला लठ्ठ बनवते

तुम्ही वजन वाढीमुळे त्रस्त असाल तर द्राक्षाचे सेवन करु नये. द्राक्षाच्या सेवनाने वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. द्राक्षे हे गोड असतात. एखाद्या व्यक्तीला भूक लागत नसेल अशा व्यक्तीने द्राक्षाचे सेवन करावे. द्राक्षाचे सेवन केल्याने भूक लागते. त्यामुळे आपण अति प्रमाणात द्राक्षे खातो. यामुळे गोडाचे प्रमाण अधिक झाल्याने वजन वाढण्याची समस्या उद्भवते.

तूम्हाला वजन वाढू नये असे वाटत असेल तर तूम्ही द्राक्ष खाणे बंद करा. द्राक्षांमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते. तर प्रथिने, चरबी, फायबर, तांबे आणि व्हिटॅमिन-के आणि थायमिन देखील द्राक्षांमध्ये असतात. त्यामूळे त्याचा थेट परिणाम आपल्या वजनावर होतो.

द्राक्ष खाल्ल्यानं वजन वाढतं

द्राक्षे कोणी खाऊ नयेत

गरोदर स्त्रीया

गरोदरपणात द्राक्ष न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यामागे एक कारण आहे ते म्हणजे, द्राक्षांमध्ये पॉलीफेनॉल आढळतात. जे रेड वाईनमध्ये देखील आढळतात. यामुळे, न जन्मलेल्या मुलामध्ये स्वादुपिंडाच्या समस्या दिसून येतात. त्यामुळे गरोदरपणात द्राक्ष सेवन करताना खूप काळजी घ्या.

ऍलर्जी असेल तर

तूम्हाला सतत कशाची ना कशाची ऍलर्जी होत असेल. तर तूम्ही प्रमाणातच द्राक्षे खा. कारण, द्राक्षांमध्ये लिक्विड प्रोटीन ट्रान्सफर असते ज्यामुळे ऍलर्जी होते. या प्रकारच्या ऍलर्जीच्या लक्षणांमध्ये खाज सुटणे, पुरळ उठणे आणि तोंडाला सूज येणे यांचा समावेश होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT