Weight Control Tips
Weight Control Tips  esakal
लाइफस्टाइल

Weight Control Tips : शरीर नाही फक्त पोट वाढत चाललंय? हा पदार्थ खाणं सुरू करा, झटक्यात वितळेल चरबी

सकाळ ऑनलाईन टीम

Weight Control Tips : आजकाल फास्टफूड आणि चुकीची जीवनशैली शरीराचे वजन वाढणे ही लोकांसाठी मोठी समस्या बनत आहे. ही चरबी कमी करण्यासाठी अनेक जण जिमचा सहारा घेतात, पण त्यातही अनेकांना यश मिळत नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या वजनाची समस्या वाढतच जाते. आज आम्ही तुम्हाला या समस्येचा सामना करण्यासाठी मनुका संबंधित उपायांबद्दल सांगणार आहोत. याच्या सेवनाने बर्फासारखी चरबी तर वितळतेच, पण पोटाची पचनक्रियाही मजबूत होते.

मनुका खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो का?

मनुक्यामध्ये भरपूर फायबर आढळते, त्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते. हे केवळ साखरेची पातळी नियंत्रित करत नाही तर वजन वाढण्यास प्रतिबंध करते. याच्या सेवनाने शरीरातील अतिरिक्त कॅलरीज कंट्रोलमध्ये राहातात. मनुका खाल्ल्याने पोट साफ राहते आणि चयापचय गती वाढते.

वजन कमी करण्यासाठी मनुके कसे वापरावे?

मनुके स्नॅक्समध्ये टाकून खा

जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल तर तुम्ही तुमच्या स्नॅक्समध्ये मनुके टाकून खाऊ शकता. असे केल्याने तुमच्या इतर गोड पदार्थ खाण्यावरही फूल स्टॉप लागेल. यामध्ये असलेले फायबर आणि लो फॅट शरीराचे वाढते वजन रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

मनुके दूधात टाकून प्या

शरीराला ताकद देण्यासाठी आणि शरीर सुडौल करण्यासाठी तुम्ही रोज मनुक्यांसोबत दूध पिऊ शकता. असे केल्याने हार्मोनल हेल्थ चांगली राहते, सोबतच वजनही नियंत्रणात राहते. ज्यामुळे शरीराचा फिटनेस चांगला राहातो. (Health & Fitness)

भिजवलेले मनुके वापरा

वजन कमी करण्यासाठी रोज रात्री मनुका पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही रिकाम्या पोटी मनुके खाण्यास सुरुवात करा. असे केल्याने शरीराची पचनक्रिया मजबूत होते आणि अतिरिक्त चरबी कमी होऊ लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT