Black Pepper sakal
लाइफस्टाइल

Black Pepper Health Benefits: काळी मिरी फक्त जेवणाचीच चव वाढवत नाही, तर आरोग्यासाठीही आहे फायदेशीर, जाणून घ्या

चव वाढवण्यासोबतच काळीमिरीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

Aishwarya Musale

बहुतेक लोक स्वयंपाक करताना चव वाढवण्यासाठी काळी मिरी वापरतात. काळी मिरी फक्त जेवणाची चव वाढवण्यात मदत करत नाही. उलट, अनेक प्रकारच्या गंभीर आजारांना दूर ठेवण्यातही काळ्या मिरीची अद्भुत भूमिका आहे.  मेडिकलन्यूजटुडे डॉट कॉमने त्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. चला तर मग जाणून घेऊया काळ्या मिरीच्या काही आरोग्यदायी फायद्यांविषयी ज्यामध्ये भरपूर पोषक असतात.

ब्लड शुगर कंट्रोल करते: काळी मिरी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. काळी मिरीला इन्सुलिनचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. काळी मिरी खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात काळी मिरी समाविष्ट करणे चांगले.

कॅन्सरला दूर ठेवते: रोजच्या आहारात काळ्या मिरीचा समावेश केल्यास स्तन किंवा हाडांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. कारण काळी मिरीमध्ये कार्सिनोजेनिक गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे काळी मिरी कॅन्सरशी लढण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

पोटाचे आरोग्य: काळी मिरी आतड्यांच्या मायक्रोबायोटाचे नियमन करण्यास आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. त्यामुळे काळ्या मिरीचा आहारात समावेश केल्याने पचनशक्ती मजबूत होते आणि गॅस, अॅसिडिटी सारखी समस्या होत नाही.

चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते: काळी मिरी खाल्ल्याने शरीरातील लिपोप्रोटीन म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. प्राण्यांवर केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. या अंतर्गत काळी मिरी खाण्यास दिल्या गेलेल्या प्राण्यांच्या शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलच्या पातळीत बरीच सुधारणा दिसून आली.

काळ्या मिरीचे तोटे: काळी मिरी खाल्ल्याने कोणतीही मोठी समस्या उद्भवत नाही. पण याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पचनास त्रास होऊ शकतो. यासोबतच तोंड आणि घशात जळजळ होण्याची समस्या होऊ शकते. पण हे फक्त काळी मिरीनेच होत नाही. आहारात कोणत्याही औषधी वनस्पती किंवा गरम मसाल्यांचा जास्त प्रमाणात समावेश केल्यामुळे ही समस्या होणे अगदी सामान्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Marathi Language Row : लोकांना मराठी सक्तीचे धडे देणारे सरकार मंत्रालयातच 'नापास'; प्रवेशद्वारावरील 'तो' फलक पाहून कपाळावर हात माराल!

सरकारी जमिनींवर आता शेती करता येणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; पण फक्त एकाच अटीवर, कोणती?

SRH vs RR PL 2026: १६ चेंडूंत फिफ्टी! वैभव सूर्यवंशीने मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड! ठरला आयपीएल इतिहासातील Baby Boss

Maharashtra SET Exam : महाराष्ट्र-गोव्यातील सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी SET परीक्षा २६ जुलैला; अर्ज प्रक्रिया २ जूनपासून ऑनलाइन सुरू

TET Exam: टीईटी परीक्षेसाठी कमी संख्या असलेल्या माध्यमाच्या उमेदवारांची परीक्षा केंद्र निश्चित

SCROLL FOR NEXT