Bhramari Pranayam Benefits esakal
लाइफस्टाइल

Bhramari Pranayam Benefits : राग शांत करण्यासाठी लाभदायी आहे भ्रामरी प्राणायाम, जाणून घ्या करण्याची पद्धत आणि फायदे

Bhramari Pranayam Benefits : नियमितपणे भ्रामरी प्राणायाम करणे, हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या भ्रामरी प्राणायामला 'हमिंग बी ब्रीदिंग टेक्निक' असे ही म्हटले जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Bhramari Pranayam Benefits : सध्याचे धकाधकीचे जीवन, बिघडलेला आहार आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी दररोज योगासने आणि प्राणायाम करण्याचा सल्ला दिला जातो.

योगातज्ज्ञ आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते नियमितपणे भ्रामरी प्राणायाम करणे हे लोकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या भ्रामरी प्राणायामला 'हमिंग बी ब्रीदिंग टेक्निक' असे ही म्हटले जाते.

हा प्राणायाम नियमित केल्याने राग शांत होतो आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. हा प्राणायाम नियमित केल्याने तुमचे मन शांत राहते. चिंता आणि राग यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी हा प्राणायाम अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. आज आपण हा भ्रामरी प्राणायाम करण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे जाणून घेणार आहोत. (Bhramari Pranayam)

भ्रामरी प्राणायाम करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी घरातील मोकळ्या जागेत किंवा स्वच्छ आणि हवेशीर जागेवर योगा मॅटवर बसा. (योगा मॅट नसेल तरी चालेल)

  • आता तुमचे डोळे बंद करा.

  • त्यानंतर, तुमच्या दोन्ही हातांची तर्जनीची बोटे दोन्ही कानांवर ठेवा.

  • आता तुमचे तोंड बंद ठेवून फक्त नाकातून श्वास घ्या.

  • श्वास सोडताना तुम्ही ओमचा उच्चार करू शकता.

  • ही प्रक्रिया आता ४-५ वेळा पुन्हा करा.

  • हा प्राणायाम जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल, तर योगातज्ज्ञाची मदत घेऊ शकता.

भ्रामरी प्राणायाम करण्याचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे :

  • ताण-तणाव दूर करण्यासाठी हा सर्वात सोपा आणि फायदेशीर प्राणायाम आहे.

  • या प्राणायामचा नियमित सराव केल्याने मेंदू शांत ठेवण्यास मदत होते आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.

  • या भ्रामरी प्राणायामचा नियमित सराव केल्याने उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे, रक्तदाबाच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

  • दररोज भ्रामरी प्राणायाम केल्याने शांत झोप लागते. ज्या लोकांना झोपेची समस्या आहे, अशा लोकांनी या प्राणायामचा न चुकता सराव करावा.

  • भ्रामरी प्राणायामचा सराव केल्याने राग शांत होण्यास मदत होते. (Bhramari Pranayam Benefits)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT