Dehydration Symptoms esakal
लाइफस्टाइल

Dehydration Symptoms : आला उन्हाळा तब्येतीला सांभाळा! उष्णतेमुळे होणारे डिहायड्रेशन काय आहे? जाणून घ्या लक्षणे

Dehydration Symptoms : उन्हाळ्याला नुकतीच सुरूवात झाली आहे. कडक उन्हाच्या झळांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

Monika Lonkar –Kumbhar

Dehydration Symptoms : उन्हाळ्याला नुकतीच सुरूवात झाली आहे. कडक उन्हाच्या झळांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या दिवसांमध्ये तहान भागवण्यासाठी पाणी जास्त प्रमाणात प्यायले जाते. पाणी हे आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे? हे आपल्या सर्वांनाच माहित आहे.

नियमितपणे पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास, शरीराच्या इतर समस्या दूर होतात. त्यासोबतच आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास पाणी मदत करते.

जेव्हा पाण्याचे सेवन कमी प्रमाणात केले जाते, किंवा शरीरातील पाण्याचे प्रमाण हे लक्षणीयरित्या कमी होणे, याला डिहायड्रेशन (निर्जलीकरण) असे म्हटले जाते. यामध्ये मीठाच्या कमतरतेचा (डिहायड्रेशनमध्ये सोडिअम क्लोराईडची कमतरता) ही समावेश होतो.

उन्हाळ्यात या समस्येचे प्रमाण सर्वाधिक वाढते. कधीकधी ताप, जुलाबसारख्या समस्या, अल्कोहोल आणि कॅफिनचे अधिक सेवन केल्याने देखील डिहायड्रेशन होऊ शकते. डिहायड्रेशनची समस्या ही लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कुणाला ही होऊ शकते. लहान मुले आणि वृद्धांमध्ये या समस्येचे प्रमाण सर्वाधिक आहे. आज आपण या डिहायड्रेशनची लक्षणे कोणती? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

थकवा आणि अशक्तपणा येणे

शरीराला थकवा येणे हे डिहायड्रेशनचे प्रमुख लक्षण आहे. डिहायड्रेशनमुळे शरीरात थकवा येऊ शकतो किंवा अशक्तपणाची समस्या निर्माण होऊ शकते. जर तुम्हाला या समस्या भेडसावत असतील तर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे आणि तुमच्या शरीराला पाण्याची जास्त गरज आहे. थकवा आणि अशक्तपणाचे लक्षण दिसल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्या आणि पाणी भरपूर प्या.

चक्कर येणे

जर तुम्ही कमी प्रमाणात पाणी प्यायले असेल, तर निर्जलीकरणामुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते. जर तुम्हाला अचानक चक्कर येत असेल तर, तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे हे प्रमुख लक्षण असू शकते. त्यामुळे, वेळीच पाणी प्या आणि पुरेसा आराम करा.

डोकेदुखी

डिहायड्रेशनच्या समस्येमुळे तीव्र डोकेदुखी होणे आणि मायग्रेनचा त्रास संभवण्याची शक्यता असू शकते. जर तुम्हाला वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी भरपूर पाणी प्या.

तहान लागणे

उन्हाळ्यात जर तुम्हाला वारंवार तहान लागत असेल, तर हे निर्ललीकरणाचे लक्षण असू शकते. याचा अर्थ तुमच्या शरीराला जास्त पाण्याची गरज आहे. त्यामुळे, याकडे दुर्लक्ष करू नका आणि भरपूर पाणी प्या. जर तुम्हाला पाणी प्यायचे लक्षात राहत नसेल, तर वेळीच ही सवय सुधारा आणि भरपूर पाणी प्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT