Fridge esakal
लाइफस्टाइल

फ्रीज साफ करायचायं? या सोप्या ट्रिक्स पडतील उपयोगी

तुम्ही तुमच्या घरातील फ्रिज व्यवस्थित आणि वेळोवेळी स्वच्छ करता का?

सकाळ वृत्तसेवा

तुम्ही तुमच्या घरातील फ्रिज व्यवस्थित आणि वेळोवेळी स्वच्छ करता का?

आपल्या घरात काही खायला असेल तर ते जास्त वेळ ताजे (Fresh) ठेवण्यासाठी किंवा खराब होऊ नये म्हणून आपण आधी फ्रीजचा (Fridge) दरवाजा उघडतो. कडाक्याच्या उन्हातही फ्रीजचा वापर जास्त होतो, पण तुम्ही तुमच्या घरातील फ्रिज व्यवस्थित आणि वेळोवेळी स्वच्छ करता का? जर योग्य पद्धतीने फ्रिज स्वच्छ करण्याचा प्रश्न तुम्हाला गोंधळात टाकत असेल तर फ्रीज साफ करण्याची योग्य ट्रिक जाणून घ्या.

फ्रीज स्वच्छ करण्यासाठी टिप्स

- जेव्हा तुम्हाला फ्रीज साफ करायचा असेल तेव्हा आधी डिफ्रॉस्ट करा. त्यानंतर ते अनप्लग करा आणि सर्व सामान बाहेर काढा.

- जर तुम्ही फ्रीजच्या ट्रे वर लाइनर्स ठेवले असतील तर ते काढून टाका आणि स्वच्छ करा. आता फ्रीझर ट्रे आणि क्रिस्पर बॉक्स होममेड क्लिनरच्या मदतीने स्वच्छ करा.

- जर तुम्ही खूप दिवसांनी फ्रिज साफ करत असाल आणि तुमच्या फ्रीजला दुर्गंधी येत असेल तर फ्रिजमध्ये अर्धा तास बेकिंग पावडर शिंपडा आणि सोडा. बेकिंग पावडर तुमच्या फ्रीजमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी काम करेल.

- यानंतर, तुम्ही ट्रेच्या दोन्ही बाजूंनी क्लिनर स्प्रे करा आणि स्वच्छ नॅपकीनने पुसून बाजूला ठेवा. फ्रीजचा साईड ट्रे काढा आणि क्लिनरने स्वच्छ करा, काढता येण्याजोगा असेल तर तो काढून स्वच्छ करणे अधिक चांगले राहिल.

- एक एक करून फ्रीजचा संपूर्ण भाग आधी क्लिनरच्या मदतीने स्वच्छ करा. त्यानंतर एका भांड्यात स्वच्छ पाणी घेऊन ते सुती कापडाने स्वच्छ करा आणि शेवटी कोरड्या कपड्याच्या साहाय्याने चांगले पुसून घ्या.

- फ्रीजमध्ये ठेवलेले व्हेजिटेबल बास्केट बाहेर काढल्यानंतर ती नीट धुवून कोरडी ठेवावी, त्याचप्रमाणे त्याच्या वरची काच टोपलीसह चांगली धुवून वाळवावी.

- आता तुमचा फ्रीज पूर्णपणे स्वच्छ झाला आहे. तुम्ही आता फ्रिज सुरु करु शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pappu Yadav: पत्रकार परिषदेतच मोठी घटना! खासदार पप्पू यादवांवर चाकुहल्ला; घटनेनं खळबळ, नेमकं काय घडलं?

IND vs SL : टीम इंडियासाठी श्रीलंका दौऱ्यातील प्लॅन ऐनवेळी बदलला! ४ दिवसांचा सामना ३ दिवसांतच संपणार

Road Protest: कनेरसर–पूर–पाबळ रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन; अपघातानंतर तातडीच्या दुरुस्तीची एकमुखी मागणी

Flipkart वरून फूड डिलिव्हरी कधी सुरु होणार? Zomato-Swiggy ला टक्कर देण्यासाठी कंपनीची खास रणनीती

Goa Foreign Liquor: डिकसळ येथे गोव्यातील प्रतिबंधित विदेशी मद्याचा 7.89 लाखांचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT