G-Spot
G-Spot esakal
लाइफस्टाइल

G-Spot चं गूढ असं काढा शोधून

सकाळ डिजिटल टीम

What is G-Spot And How to find During Sex : चांगल्या सेक्स लाइफसाठी पुरुषांप्रमाणे महिलांनाही ऑर्गेझम मिळणे आवश्यक असते. पण महिलांच्या आरोग्याचा विषय निघतो तेव्हा जी-स्पॉटवर वाद होतात.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जी स्पॉट एक यूरेथ्रल स्पंज आहे. जो योनीच्या तोंडाला धकतो. तो इरेक्टेड लिंगाप्रमाणे उत्तेजित झाल्यावर हा स्पंज मोठा होतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही उत्तेजित होतात तेव्हा त्याला सहज शोधू शकतात.

पण काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जी-स्पॉट असं काही नसतं कारण दरवेळी प्रत्येकच महिला ऑर्गेझामचा आनंद घेऊ शकेल असं नसतं. काही महिला ऑर्गेझम मिळाल्याचं म्हणतात तर काही हे आम्हाला शोधताच येत नाही असं म्हणतात.

जी स्पॉट काय आहे?

  • हा महिलांच्या योनीचा असा भाग आहे जो लैंगिक उत्तेजनाविषयी संवेदनशील असतो.

  • काहींच म्हणणं आहे की, त्यांना या भागात उत्तेजना एकतर ऑर्गेझमच्या वेळी अनुभवायला येते किंवा सामान्यापेक्षा अधिक ल्युब्रिकेशन तयार होतं तेव्हा.

  • काहा लोकांना लैंगिक क्रिये दरम्यान यामुळे अत्यंत आनंद मिळतो.

  • तर काहींचं म्हणणं आहे की, यामुळे संभोगाच्या वेळी योनीत प्रवेश करणं शक्य होतं.

G-Spot

जी-स्पॉट विषयीचे अनुभव

  • प्रत्येकीचे याविषयीचे अनुभव वेगवेगळे असल्याचे आढळते.

  • काही महिलांना जी स्पॉट मिळत नाही.

  • काहींना त्यांच्या आत जी स्पॉट आहे यावर विश्वास नसतो.

  • काहीना ही उत्तेजना त्रासदायक वाटते.

G-Spot

कुठे असतो हा स्पॉट?

  • याविषयी बहुतेकांचे अनुभव वेगवेगळे आहेत. जोडप्यांचाही अनुभव वेगवेगळा आहे.

  • बहुतेकांचं म्हणणं आहे की योनीत वरच्या बाजूला सर्वाधिक संवेदनशीलता जाणवते.

  • तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जी स्पॉट योनीच्या आत २-३ सेटीमीटरवर असतो.

  • काही लोक म्हणतात की, त्याला स्पर्श करताच काही दाणेदार लागतं.

  • काही महिलांचं म्हणणं आहे की इथे फार जोर लावावा लागतो.

  • काही महिलांना इथे स्पर्श करताच लघवी करण्याची इच्छा होते. शक्यता आहे कारण हे मुत्राशयाच्या खाली असते.

जी स्पॉट शोधणार कसा?

  • कडक, मऊ, व्हायब्रेशन, थोपटणे अशा वेगवेगळ्या प्रकारे उत्तेजना देऊन बघा.

  • जी स्पॉटसाठी डिझाइन केलेल्या सेक्स टॉयचा वापर करून बघा.

  • या जागेपर्यंत पोहचण्या योग्य स्थिती घ्या.

  • योनीच्या वेगवेगळ्या भागांना स्पर्श करून बघा, दाब देऊन बघा जे चांगलं किंवा वेगळं वाटेल तिथे लक्ष द्या.

  • पहिले जोडिदाराशिवाय जी स्पॉट शोधण्याचा प्रयत्न करा. कारण हा भाग फार संवेदनशील असू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT