pocketing relationship sakal
लाइफस्टाइल

Relationship Tips: पॉकेटिंग रिलेशनशिप म्हणजे काय? तुम्ही तर नाही ना अशा नात्यात?

पॉकेटिंग रिलेशनशिपचे काही फायदे पण आहे आणि काही तोटे पण. चला तर पॉकेटिंग रिलेशनशिपबद्दल सविस्तर जाणून घेऊया

सकाळ डिजिटल टीम

माणूस म्हणून आपण वेगवेगळे नाते निभवत असतो पण सर्वात स्पेशल नाते हे प्रेमाचे नाते असते. हल्ली त्याला आपण रिलेशनशिप सुद्धा म्हणतो. याच रिलेशनशिपचा भाग असलेल्या पॉकेटिंग रिलेशनशिप' बद्दल तुम्हाला माहिता आहे का? नाही? कदाचित तुम्ही पण अशा रिलेशनशिपचा भाग असू शकता.

पॉकेटिंग रिलेशनशिप (Pocketing Relationship) म्हणजे आपल्या नात्याला जगापासून लपविणे. जसे आपण कपड्यांच्या पॉकेटमध्ये काही लपवितो, अगदी तसेच. पण हे नाते चुकीचे आहे. याचे काही फायदे पण आहे आणि काही तोटे पण. चला तर पॉकेटिंग रिलेशनशिपबद्दल सविस्तर जाणून घेऊया (what is mean by pocketing relationship check here causes advantages and side effects)

उदाहरण तुम्ही कुणा मुलाला किंवा मुलीला डेट करत आहात आणि तुमचा फ्रेंड सर्कल कॉमन आहे. पण तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या या रिलेशनशिपबद्दल कोणाला माहिती नाही. दोघे एक दुसऱ्यासमोर अनोळखी असण्याचं नाटक करतात. एवढंच काय तर सोशल मीडियावर आपलं नातं समोर आणत नाही. अशा रिलेशनशिपला(Relationship) पॉकेटिंग रिलेशनशिप म्हणतात.

पॉकेटिंग रिलेशनशिपचे फायदे

पॉकेटिंग रिलेशनशिप हे एक असं नातं असतं की ज्याचे फायदे कमी आणि नुकसान जास्त आहे. या नात्यात राहण्याचा एकच फायदा आहे की हे तुमचे सीक्रेट्स सर्वांसमोर आणत नाही. तुम्ही लपून छपून एक- दूसऱ्याला डेट करू शकता. जर तुम्ही तुमच्या पार्टनरला घेऊन खुप पजेसिव असाल तर पॉकेटिंग रिलेशनशिप करू शकता.

पॉकेटिंग रिलेशनशिपचे नुकसान

पॉकेटिंग रिलेशनशिप कोणत्याही प्रकारे चांगलं नसतं. अशा प्रकारच्या नात्यात इनसिक्योरिटीची भावना निर्माण होते. अशा नात्यात पार्टनर असूनही सिंगल असल्याची भावना असते. यात भविष्याला घेऊन कोणताही प्लान नसतो आणि नात्याची खुप कमजोर असते. यात विश्वास असणे गरजेचे आहे. यात धोखा मिळण्याचीही शक्यता जास्त असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT