Best Tips for Cleaning Fruits Sakal
लाइफस्टाइल

Best Tips for Cleaning Fruits : सावधान ! फळे स्वच्छ करण्यासाठी चुकीची पद्धत वापरताय? आरोग्यावर होतील दुष्परिणाम

फळांवर असणाऱ्या जंतूंमुळे आरोग्यावर कोणतेही गंभीर दुष्परिणाम होऊ नयेत, याकरिता फळे कशा पद्धतीने स्वच्छ धुवायची याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

मांसमासे खाण्यापूर्वी ते योग्य पद्धतीने स्वच्छ करून नंतर पाण्याने नीट धुणे आरोग्यासाठी आवश्यक आहे, हे आपण सर्वांनाच माहिती आहे. कारण नॉनव्हेज योग्यरित्या स्वच्छ न करताच त्याचे सेवन केले तर आजारांची लागण होऊ शकते.

त्याचप्रमाणे फळे देखील नीट स्वच्छ धुऊन न खाल्ल्यास अतिसार यासारख्या आजारांची लागण होऊ शकते, हे आपणास माहिती आहे का? फळे न धुता खाल्ल्यास साल्मोनेला (Salmonella) आजाराची लागण होऊ शकते.

साल्मोनेला म्हणजे काय?

साल्मोनेला हा एक जीवाणू आहे, तो मुख्यतः आतड्यांमध्ये आढळतो. यामुळे अन्नपदार्थांद्वारे विषबाधा होऊ शकते.

फळे कशा पद्धतीने स्वच्छ करावीत, जाणून घेऊया काही पद्धती

फळे नेहमी वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवावीत

फळे तसंच भाज्या स्वच्छ करण्यासाठी साबण, डिटर्जंट, ब्लीच सोल्यूशन्स किंवा इतर कोणत्याही निर्जंतुकीकरण उत्पादनांचा वापर चुकूनही करू नये. फळे धुण्यासाठी नेहमी वाहत्या पाण्याचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. 

म्हणजे आपण नळ उघडून वाहत्या पाण्याखाली फळे स्वच्छ धुऊ शकता. पण पाण्याचा अपव्यय होणार नाही, याचीही काळजी घ्यावी. फळे व भाज्या खाण्यापूर्वी स्वच्छ का करावीत, तर फळे-भाज्या कापल्यानंतर सालीवर असणारे घातक जंतू शरीराच्या आत प्रवेश करण्याची शक्यता असते. यामुळे आरोग्यास अपाय होऊ शकतो.

हाताने हलकासा दाब देऊन फळे स्क्रब करणे

सफरचंद, लिंबू, पेर, पेरू यासारख्या टणक आवरणाच्या फळांच्या साली आपण हलक्या हाताने स्क्रब करू शकता. ज्यामुळे फळांवरील मृत जंतू तसंच शरीरास अपायकारक असणारे घटकही सहजासहजी काढण्यास मदत मिळेल.

पण ही क्रिया करताना अधिकचा ताण देऊ नये. ज्याप्रमाणे आपण चेहऱ्याच्या त्वचेचं हलक्या हाताने स्क्रब करताना त्याचप्रमाणे प्रक्रिया करावी. महत्त्वाचे म्हणजे याकरिता कोणतेही साबण किंवा क्रीमचा उपयोग करू नये.

तसंच फळांच्या छिंद्रामध्ये अडकलेले घातक जंतू काढण्यासाठी मऊ ब्रशचा वापर करावा.   पण बेरी, चेरी, पीच यासारख्या मऊ आवरणाची फळे स्वच्छ करण्याकरिता ब्रशचा वापर करू नये. ही फळे पाण्यानेच स्वच्छ धुऊन घ्यावीत.

ताजी फळे स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर त्यावर पुन्हा जंतू बसू नयेत, असे वाटत असल्यास स्वच्छ कागद किंवा कापडी टॉवेलनं फळे पुसून घ्यावीत. तर मऊ आवरण असलेल्या फळांना स्वच्छ टॉवेलवर केवळ ठेवून वाळवण्याचा सल्ला दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

Ganesh Festival 2025 : खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या; पूजा आणि सजावटीच्या साहित्यासाठी पुणेकरांची लगबग

SCROLL FOR NEXT