लाइफस्टाइल

Gas Cylinders: सिलिंडरचा नव्हे, तर गॅसचा होतो स्फोट! गॅस सिलिंडरचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी? वाचा सविस्तर

Gas Cylinders: ग्राहकांनी योग्य सुरक्षा बाळगल्यास दुर्घटनेची शक्यता कमी असते. गॅसला वास याच्यासाठीच दिलेला आहे की गॅस लीकेज होत असल्यास संबंधितांना लगेच ही बाब लक्षात येऊन पुढील अनर्थ टाळता येतो.

सकाळ वृत्तसेवा

किराडपुरा भागातील दुर्घटनेनिमित्त गॅस सिलिंडरचा स्फोट नेमका कशामुळे आणि कसा होतो याबाबत सर्वांनाच माहिती असणे गरजेचे आहे. यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सविस्तर माहिती दिली. अशा घटनांमध्ये सिलिंडरचा म्हणजे टाकीचा नव्हे, तर आतील गॅसचा स्फोट होऊन आग भडकते. यामध्ये गॅस गळती होणे हेच मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.

गॅसची टाकी फुटण्याची घटना अतिशय दुर्मिळ असते. यामध्ये गॅस सिलिंडर वापरताना योग्य ती सुरक्षा घेतल्यास दुर्घटना नक्कीच टळू शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले. कोणत्याही गॅस सिलिंडरचा वापर करताना त्यामध्ये एलपीजी म्हणजेच लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस वापरण्यात येतो. हा गॅस सिलिंडरमध्ये पूर्णपणे बंद असतो. सिलिंडर गोडाउनमधून बाहेर काढतानाच त्याचे सील व्यवस्थित आहे की नाही, याची खात्रीलायक तपासणी करून ते देण्यात येते.

काय घ्यावी काळजी?

सिलिंडर लीक झाल्यानंतर काय काळजी घ्यावी याच्या काही गाइडलाइन्स ठरवून दिलेल्या आहेत.

घरातील दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवा.

ज्वालाजवळ ज्वलनशील, प्लॅस्टिक वस्तू ठेवू नका.

स्वयंपाक कधीही लक्ष न देता अर्धवट सोडू नका.

सहज आग लागणार नाही, असे कपडे घाला.

सिलिंडर वापरात नसताना रेग्युलेटर नॉब बंद करा.

घाबरून न जाता गॅस सिलिंडरला ओले पोते गुंडाळा. यातून त्याला ऑक्सिजन भेटणार नाही, आगीची तीव्रता कमी होईल.

लीकेजचा थोडा वास आल्यास रेग्युलेटर काढा, सीलला कॅप बसवा.

या चार कारणांपैकी कोणत्याही कारणाने गॅस लीकेज होत असल्यास आणि त्याचा ठिणगीशी थोडाजरी संबंध आला तरी लीकेज असलेल्या सोर्सद्वारे आग सीलद्वारे सिलिंडरच्या आतमध्ये पोचते. लीकेज असलेल्या जागेतून आग आणि ऑक्सिजन आतमध्ये शिरल्यानंतरच भडका उडतो. तथापि, लगेच स्फोट होत नाही.

रेग्युलेटर ज्या ठिकाणी लावण्यात येते ते सील सुरवातीच्या आगीमुळे वितळून हीच आग सिलिंडरमधील गॅसपर्यंत पोचते. यानंतर सिलिंडरमधील गॅस अतिदाबाने बाहेर यायला सुरवात होते आणि आग भडकते. सिलिंडरमध्ये जितका गॅस असेल त्याच्या १० पटीने या गॅसचा स्फोट होण्याची क्षमता यामध्ये असते.

यामध्ये टाकीचा स्फोट होऊन त्याचे तुकडे होतीलच असे नाही. गॅस सिलिंडर बनवतानाच ते फुटू नये अशा पद्धतीने ते बनवण्यात येते. तरीदेखील गॅसच्या स्फोटावर हे अवलंबून असते. गॅस टाकीची म्हणजेच सिलिंडरची बॉडीच लीकेज असेल तर या स्फोटाची तीव्रता आणखी वाढते.

गॅस लीकेजची प्रमुख चार ते पाच कारणे आहेत. ग्राहकांनी योग्य सुरक्षा बाळगल्यास दुर्घटनेची शक्यता कमी असते. गॅसला वास याच्यासाठीच दिलेला आहे की गॅस लीकेज होत असल्यास संबंधितांना लगेच ही बाब लक्षात येऊन पुढील अनर्थ टळावा.

— प्रल्हाद काबरा, गॅस वितरक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : गुडलक कॅफे प्रकरणाची व्यवस्थापनाकडून दखल, कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु

SCROLL FOR NEXT