Benefits of Pulses esakal
लाइफस्टाइल

Benefits of Pulses : आरोग्यासाठी लाभदायी असलेली डाळ कोणती ? जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटकांचा समावेश असतो.

सकाळ डिजिटल टीम

Benefits of Pulses : भारतीय खाद्यपदार्थांमध्ये निरनिराळ्या पदार्थांचा समावेश होतो. डाळ आणि भात हे आपल्या रोजच्या जेवणात आवर्जून खाल्ले जाणारे घटक आहेत. डाळींचा वापर करून आपण फोडणीचे वरण आणि भात शिजवतो. कधीकधी डाळीची मस्त ग्रेव्ही करतो आणि भात किंवा चपातीसोबत ती आवर्जून खातो.

डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटकांचा समावेश असतो. डाळींमध्ये मूग डाळ, हरभरा डाळ, तूर डाळ, मसूर डाळ इत्यादी डाळींचा समावेश होतो. डाळींमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. त्यामुळे, आहारात डाळींचा समावेश करणे महत्वाचे आहे.

परंतु, या सर्व डाळींमध्ये आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेली आणि पचनास हलकी असलेली डाळ कोणती ? आणि डाळीचे फायदे कोणते आहेत ? ते आज आपण जाणून घेणार आहोत.

आरोग्यासाठी कोणती डाळ फायदेशीर ?

मागील काही वर्षांमध्ये डाळींना पॉलिशिंग करण्याचे प्रमाण वाढले आहे. डाळ चमकदार दिसण्यासाठी हे पॉलिशिंगचे प्रमाण वाढले आहे. मात्र, डाळींना पॉलिशिंग केल्याने त्यातील नैसर्गिक पोषकतत्वांचे प्रमाण कमी होते.

खरे तर अनपॉलिश अर्थात पॉलिश न केलेल्या डाळी या आरोग्यासाठी चांगल्या असतात. कारण, पॉलिश न केलेल्या मसूर डाळीच्या आवरणामध्ये (डाळीचे साल) भरपूर प्रमाणात फायबर असते. हे आरोग्यासाठी चांगले असते.

पॉलिशिंग केल्याने डाळींपासून त्यांचे नैसर्गिक फायबर वेगळे होतात. पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी डाळींचे हे फायबर आवश्यक असते. शिवाय, पॉलिश न केलेल्या मसूर डाळीमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे, ही डाळ चवदार ही लागते आणि या डाळीमध्ये पौष्टिक घटकांचे प्रमाण ही जास्त आढळून येते.

डाळ खाण्याचे फायदे कोणते ?

रोगप्रतिकारक क्षमता वाढते

डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिनांचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, डाळींचा आहारात समावेश असणे महत्वाचे आहे. डाळींमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. तसेच, अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते.

पचनक्षमता सुधारते

डाळींमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे, आपल्या शरीराची पचनक्षमता सुधारते. त्यामुळे, डाळींचा आहारात जरूर समावेश करा. पचनक्षमता सुधारण्यास डाळींची मदत होते.

मधुमेहाचा धोका कमी होतो

डाळींमध्ये पोषकघटकांचा समावेश मोठ्या प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे, मधुमेह असणाऱ्या लोकांनी आहारात डाळींचा समावेश करावा. तसेच, डाळींमध्ये ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असते. त्यामुळे, रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. ती नियंत्रणात राहण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT