Baby Care Tips esakal
लाइफस्टाइल

Baby Care Tips : लहान मुलांसाठी स्किनकेअर उत्पादने खरेदी करण्यापूर्वी, पालकांनो लक्षात ठेवा 'या महत्वाच्या गोष्टी

Baby Care Tips : नवजात बालकांची त्वचा ही अतिशय नाजूक असते. त्यामुळे, नवजात बालकांची सुरूवातीपासूनच खास काळजी घेणे, गरजेचे आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Baby Care Tips : नवजात बालकांची त्वचा ही अतिशय नाजूक असते. त्यामुळे, नवजात बालकांची सुरूवातीपासूनच खास काळजी घेणे, गरजेचे आहे. ऋतू कोणताही असो मग, तो उन्हाळा, हिवाळा किंवा पावसाळा त्या प्रत्येक ऋतूप्रमाणे त्यांच्या त्वचेला कोणती उत्पादने सूट होत आहेत? ते पहावे लागते.

कारण, बाळाच्या त्वचेला जर स्किनकेअर उत्पादने सूट नाही झाली तर याचा बाळाच्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, या बद्दल पालकांनी जागरूक असणे महत्वाचे आहे. बाळासाठी महत्वाची असणारी ही स्किनकेअर उत्पादने खरेदी करण्यापूर्वी पालकांनी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर टाळा

लहान मुलांसाठी कोणते ही स्किनकेअर उत्पादन खरेदी करताना केमिकल्सने युक्त असलेले प्रॉडक्ट्स वापरणे टाळा. कारण, यामुळे, त्यांच्या त्वचेला इजा होण्याची किंवा अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते.

कधीकधी बाळाला रॅशेज किंवा पुरळ देखील येऊ शकतात. त्यामुळे, नवजात बालकासाठी स्किनकेअर उत्पादने खरेदी करण्यापूर्वी त्या प्रॉडक्ट्समध्ये सल्फेट आणि पॅराबेन्स नसल्याची खात्री करा. शक्यतो लहान मुलांसाठी केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स खरेदी करणे टाळा. (Avoid chemical products)

सेंद्रिय स्किनकेअर उत्पादने खरेदी करा

लहान मुलांची त्वचा ही मूळातच खूप नाजूक असते. त्यामुळे, थंडी, वारा आणि ऊन-पावसाचा मुलांच्या त्वचेवर लगेच परिणाम होतो. त्यामुळे, त्यांच्यासाठी नेहमी सेंद्रिय स्किनकेअर उत्पादने (Organic Skincare Products) खरेदी करा.

एक महत्वाची बाब म्हणजे, ही स्किनकेअर उत्पादने जास्त सुगंधित नसावीत. कारण, यामुळे, तुमच्या बाळाला हानी पोहचू शकते. नवजात बालकासाठी तुम्ही सेंद्रिय साबण, शॅंम्पू, लोशन, डायपर आणि अगदी वाइप्स देखील खरेदी करू शकता. यामुळे, बाळाच्या त्वचेची नीट काळजी घेतली जाईल. (Organic Skincare Products)

ऋतूनुसार आणि वयानुसार प्रॉडक्टसची करा निवड

तुमच्या बाळासाठी स्किनकेअर उत्पादने खरेदी करण्यापूर्वी ती सध्याच्या वातावरणाप्रमाणे किंवा ऋतूप्रमाणे खरेदी करा. उदा, हिवाळ्यासाठी वेगळी आणि उन्हाळ्यासाठी वेगळ्या उत्पादनांची खरेदी करा.

ऋतूप्रमाणे उत्पादनांची खरेदी करताना तुम्ही तुमच्या बाळाचे वय देखील लक्षात घ्यायला हवे. उदा, जर तुमचे बाळ ६ महिन्यांपर्यंतचे असेल तर त्यांच्या त्वचेची काळजी घेणारे प्रॉडक्ट्स खरेदी करा. जर तुमचे बाळ १ वर्षापेक्षा मोठे असेल तर, त्याच्या किंवा तिच्या वयाप्रमाणे स्किनकेअर प्रॉडक्ट्स खरेदी करा. (Choose products according to season and age)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी विजय मेळाव्यासाठी नवी मुंबईतून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT