खणाच्या साड्या 
लाइफस्टाइल

कर्नाटकला खणाच्या साडीचं माहेरघर का म्हटलं जातं माहितीये?

साड्यांमधली सध्याची ट्रेंडिंग साडी म्हणेज खणाची साडी. पण खण हा प्रकार आला कुठून, हे तुम्हाला माहितीये?

दिपाली सुसर

साडी म्हणजे प्रत्येक बाईचा अगदी जवळचा विषय असतो. कपाट साड्यांनी गच्च भरलेला असला तरी नवीन प्रकारात साडी आली की ती हवीहवीशीच असते, असं हे बायकांच साडी प्रेम. याच साड्यांमधली सध्याची ट्रेंडिंग साडी म्हणेज खणाची साडी. पण खण हा प्रकार आला कुठून, हे तुम्हाला माहितीये? चला तर आज आम्ही तुम्हाला दोन पिढ्यांना जोडणाऱ्या खणाची गोष्ट सांगणार आहोत.

कर्नाटक हे माहेरघर

साड्यांचे दिडशेपेक्षा जास्त प्रकार आहेत. त्यातला एक प्रकार म्हणजे कर्नाटकात तयार होणारी खण साडी. खणाच्या साडीचा इतिहास अगदी 400 वर्षांपूर्वीचा आहे. चाणक्याच्या राज्यातील बायका खणाच्या साड्या नेसायच्या, असा दावा काही इतिहास संशोधकांनी केला आहे. कर्नाटकासोबत महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा हे खणाच्या कापडाचं माहेरघर असल्याचंही म्हटलं जातं. महाराष्ट्रात घराघरात ऐकलं जाणारं वाक्य 'खणा नारळाने देवीची, सुवासिनीची ओटी भरा'. खण म्हणजे चोळी किंवा ब्लाउजचं कापड असं समीकरण अगदी ठरलेलं असायचं. पण खणाचं वास्तव तसं नसून खण हे एक स्वतंत्र असं वस्त्र आहे.

खणाच्या नक्षीवरून कर्नाटकातील संस्कृतीचे दर्शन

मध्यंतरीच्या काळात खणाचं कापड विस्मृतीत गेला होता. मात्र, काही फॅशन डिझायनर्सनी या फॅब्रिकचा वापर करत नवीन डिझाईन तयार केले आणि पुन्हा एकदा हे फॅब्रिक बाजारात आलं.खण म्हणताच मोठ्या काठाचं आणि भरीव असं बारीक डॉट्स असणारं वस्त्र डोळ्यासमोर येतं. खणाच्या कापडांमध्ये डिझाईन देखील बरेच असतात. खणाच्या नक्षीवरून कर्नाटकातील संस्कृतीचे दर्शन होतं.

पॉवरलूम उद्योगामध्ये वाढ झाल्यानंतर या खणाची मागणी बरीच कमी होत गेली. अगदी संपुष्टात येण्याच्या मार्गावर होती. परंतु काही डिझायनर्स आणि विणकरांमुळे आता पुन्हा खणास उत्तम दिवस आले आहेत. आता तर खण दिमाखात रॅम्पवर कॅट वॉक देखील करतो आहे.

खणाचे विणकाम हे ब्रोकेडप्रमाणे असते. मात्र मोठे काठ त्यात जरीचे काट ही खणाची ओळख मानली जाते. खणाचे वस्त्र कॉटन किंवा कॉटन सिल्क या धाग्यांपासून विणलं जातं.

खण कापड बनवण्यासाठी ज्या प्रकारचे हातमाग लागतात, ते विणकरांच्या घरातच असतात. त्यांच्या कुटुंबातील सर्वच व्यक्ती विणकामात तरबेज असतात. कर्नाटकमधील अनेक गावे तर साड्यांच्या निर्मितीसाठी लोकप्रिय आहेत. इथं घराघरात विणकर आढळतात.

पूर्वी खण म्हटलं की सगळ्या साडीवर घालता येणारे ब्लाऊज असायचं पण आता परिस्थिती वेगळी आहे. खणाचे कापड आता मोठ्या पन्न्यात ही विणता येत असल्याने सध्या खणाच्या साड्या, कुर्तीज, ओढण्या यांची खूप जास्त मागणी मार्केटमध्ये आहे.

जेवढी मागणी तेवढा सप्लाय हे सूत्र असल्याने खण पुन्हा लाईम लाईटमध्ये आहे. खणाच्या कपडापासून काही डिझायनर वेस्टर्न कपडेदेखील बनवत आहेत. स्कर्ट, टॉप्स, ब्लेझर, वनपीस सारखे खणाचे ड्रेसेस खूप लोक वापरत आहेत, असे दिसून येते. तसेच लहान मुलींसाठी परकर-पोलकी तर प्रचंड डिमांडमध्ये आहेत.

सणावाराला असे कपडे फार विकले जातात. आता ब्लाउजमध्ये देखील भरपूर व्हरायटी आली आहे. खणाच्या ब्लाउजमध्येही बोट नेक, स्लीव्हलेस, हॉल्टर नेकमध्ये असे पॅटर्न बनवले जातात. शिवाय हे असे कापड आहे की ते कशासोबत ही पेअर करता येतं.

खणाच्या साध्या साडीची किंमत जवळपास 1200 रुपयांपासून सुरुवात होते. यातही फॅब्रिक चांगल्या दर्जाचं असेल तर किंमत वाढत जाते. त्यामुळे चांगल्या दर्जाची खणाची साडी जवळपास 2300 रुपयांपासून पुढे मिळते.मात्र, नथीची नक्षी, सरस्वतीची नक्षी असलेल्या साड्यांही आता बाजारात उपलब्ध आहेत. नथीची नक्षी असलेली साडी 2 हजारांपासून उपलब्ध आहेत. त्यातच काही ठिकाणी फॅब्रिक हलक्या दर्जाचे असले तर साडी कमी किमतीतही मिळते.

खण साडीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही सोनाली डालवाले यांच्याशी संपर्क साधला. सोनाली यांचा इन्स्टाग्रामवर ‘मीरा-द लूम अफेर’ या नावाने एक पेज आहे. या पेजच्या माध्यमातून त्यांनी खणाच्या साडी व्यवसाय सुरू केला. आताही खण साडीची चांगलीच मागणी वाढलेली असल्याचं त्या सांगतात. यामुळे त्यांच्या उत्पनातही वाढ झाली आहे.

khan-saree-trend

खण साडीबद्दल त्या सांगतात, मी कर्नाटकतील बेळगावजवळील एका गावावरुन खण साडी आणते. मी ज्या विणकराकडून खण साडी तयार करुन घेते, त्यांची सहावी पिढी सध्या हे काम करत आहे.

"आता खण साडीमध्येसुध्दा मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे. चायना सिल्क वापरुन लोक 200 रुपयांत खण साडी तयार करतात आणि ती पुढे हजार रुपयात विकली जाते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते.

"खण कपडा ज्या धाग्यापासून तयार होते तो फार नाजूक असतो त्यामुळे मोठ्या मशनरीजचा भार त्याला झेपत नाही. त्यामुळे खण कपडा तयार करायची पद्धत किचकट असते. खणात जितकं रेशम जास्त तितकी खणांची किंमत वाढत जाते."

खण म्हणजे पिढ्यांना जोडणारा दुवा

खण हे पिढयांना जोडण्याचा दुवा आहे. मी माझ्या आईला खणाविषयी विचारलं असता ती सांगू लागली की, लहानपणी त्यांना वर्षातून एकदा सणावाराला खणाची चोळी आणि परकर शिवला जायचा. पुढे लग्नाच्या वेळी मग चांगल्या दर्जाची खणाची साडी घेतली जायची. तीच साडी मग ती कित्येक वर्षे कौतुकानं वापरायची.

आता जेव्हा माझी भाची खणाचा ड्रेस घालते तेव्हा आईला फार आनंद होतो. कदाचित तिला तिच्या नातीत तिचं बालपण दिसत असेल आणि हे बालपण खणांच्या ड्रेसमुळे दिसत असेल.

थोडक्यात काय तर सध्या खण नवजात बालकापासून 80 वर्षांच्या आजीपर्यंत सगळयांचा जिव्हाळ्याचा विषय झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT