Facts About Men esakal
लाइफस्टाइल

Facts About Men : स्त्रियांप्रमाणे पुरुष स्तनपान करत नाहीत तरी त्यांना निपल्स का असतात? वाचा कारण

पुरुष स्तनपान करत नाहीत तर मग या अवयवाचा उपयोग काय असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल

सकाळ ऑनलाईन टीम

Facts About Men : महिलांप्रमाणे पुरुष बाळाला कधीच स्तनपान करत नाही तरी मात्र पुरुषांना निपल्स असतात. त्यामागे नेमकं काय कारण असावं असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? पुरुष स्तनपान करत नाहीत तर मग या अवयवाचा उपयोग काय असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. आज आपण त्यामागचं कारण जाणून घेऊया.

पुरुषांना निपल्स का असतात?

स्तनाग्रांचा (Nipples) विकास मानवी भ्रूणांमध्येच सुरू होतो. नर आणि मादी भ्रूणाच्या जनुकांमध्ये (Genes) फारसा फरक नसतो. न्यूयॉर्क शहरातील अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीमधील पॅलेओएनथ्रोपोलॉजिस्ट इयान टॅटरसॉल यांनी सांगितले की, गर्भातील नर किंवा मादी भ्रूणामध्ये सुरुवातीला समान अनुवांशिक ब्लूप्रिंट असते. म्हणजेच दोघांच्याही भ्रूणाच्या जनुकांमध्ये काही फरक नसतो.

पुरुषांमध्ये या अवयवाचा नेमका उपयोग काय?

पुरुषांमध्ये स्तनग्र हा एक वेस्टिजियल अवयव आहे. वेस्टिजियल म्हणजे निरर्थक ज्याचा काहीही उपयोग नसतो. गर्भधारणेच्या सहा ते सात आठवड्यांनंतर Y गुणसुत्रांमुळे (Y Chromosome) पुरुषाचे शरीर तयार होऊ लागते. सर्वात आधी, Testes चा विकास होतो. हा अवयव शुक्राणू (Sperm) साठवण्याचे काम करतो. (Health)

तसेच, Y गुणसुत्रांमुळे टेस्टोस्टेरॉन (Testosterone) हार्मोन देखील तयार करतो, हा हार्मोन पुरुष संप्रेरक असतो. हे हार्मोन गर्भाच्या विकासाच्या वेळी 9 आठवड्यांपासून बाहेर पडण्यास सुरुवात होते. या हार्मोनमुळे भ्रूणामध्ये जननेंद्रियांशी संबंधित अनुवांशिक बदल होण्यास सुरुवात होते. मेंदूचाही अशाच प्रकारे विकास होऊ लागतो.

पुरुषांमध्ये निपल्सची गरज आहे काय?

इयान टॅटरसॉल यांनी सांगितले की, पुरुषांमध्ये हा अवयव असण्याचे काहीही फायदे नाहीत. उलट या अवयवाची पुरुषांना गरज नसते. हा अवयव नसल्यास पुरुषांवर त्याचा काहीही प्रभाव पडत नाही.

पुरुषांमध्ये निपल्स असण्याचं नेमकं कारण काय?

सुरुवातीला मादी आणि नर भ्रूणाचा विकास सारख्याच प्रकारे होतो. त्यामुळे भ्रूणामध्ये स्तनाग्र सुरुवातीपासूनच असतात. त्यानंतर गुणसुत्रांमुळे भ्रूणा जननेंद्रियांशी संबंधित अनुवांशिक बदल होण्यास सुरुवात होते. त्यानंतर त्याचे मादी आणि नर भ्रूणात रुपांतर होते. पुढे वयानुसार, पुरुष आणि महिलांमध्ये जननेंद्रियांसंबंधित बदल होतात. त्यामुळे पुरुषांच्या शरीरात आधीपासून उपस्थित असलेले स्तनाग्र कायम राहतात. त्यांचा पुरुषांना काहीही उपयोग होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेली रशियन महिला ८ वर्ष स्वयंपाक कशी करायची? मुलींना काय खायला द्यायची?

'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Gokul Milk Politics : आप्पा महाडिकांनी थेट मुश्रीफांनाच घेतलं अंगावर, कारभार चांगला, मग ‘टोकण’ कशासाठी?

Nagpur Crime: कर्जदाराचे अपहरण, जिवे मारण्याची धमकी; सावकारासह चौघांना अटक

Latest Marathi News Updates : भाजप आमदार बसवराजविरुद्ध गुंडाच्‍या खूनप्रकरणी एफआयआर दाखल

SCROLL FOR NEXT