why relationships get shattered in early-stage know the Reasons sakal
लाइफस्टाइल

तुमचं नातं सुरूवातीच्या काळातच का तुटते? तुम्ही 'या' चूका करत नाही ना!

सकाळ डिजिटल टीम

Relationship Tips Marathi : प्रेमात(Love) पडल्यानंतर नात्यामध्ये सुरूवातीचा काळ हा खूप काळजीपूर्वक हाताळवा लागतो. कोणतेही रिलेशनशीप(Relatioship) नेहमी दोन लोकांमध्ये एकेमेकांवरील विश्वास (Trust)आणि समजूदारपणा (Understanding) टिकून असते. कित्येकवेळा आपण पाहतो की, काही लोकांचे नातं सुरूवातीच्या काळात तूटून जाते. दिर्घकाळासाठी कोणासोबतच नाते टिकवू शकत नाही आणि नेहमी दुखी राहतात. असे जाणून घेणे गरजेचे आहे की, असे का होते? बहूतेक लोकांचे नाते तुटण्यासाठी पार्टनरला जबाबदार ठरवितात पण एकदा स्वत:चे काय चुकले याचा विचार केला पाहिजे. तुमच्या कोणत्या सवयी नाते तुटण्यासाठी कारणीभूत ठरतात.

दिवसभर काही सपंर्क न साधणे :

पूर्ण दिवसामध्ये कमीत कमी एकदा पार्टनरसोबत कॉन्टेक्ट (Contact)करणे गरजे आहे. त्यांना फोन किंवा मेसेज करत राहा कारण कित्येकदा तुम्ही कामामध्ये इतके हरवून जाता की त्यामुळे पार्टनरच्या(Parter) संपर्कात राहायाला विसरून जाता. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला वाटते की, तुम्हाला त्यांचे आजिबात काळजी नाही. अशा वेळी गरजेचे आहे की कॉल नाही तर कमीत कमी वेळच्या वेळी मेसेज करुन आपल्या पार्टनरसोबत गप्पा मारू शकता.

भेटण्यासाठी वेळ काढणे :

जर तुमचे नातं नवे-नवे असेल तर तुम्ही आपल्या पार्टनरला भेटण्यासाठी वेळ काढला पाहिजेय नेहमी मित्र-परिवारासोबत आउटिंगशिवाय पार्टनरसाठी देखील वेळ दिला पाहिजे. असे न केल्यास कित्येक वेळा छोट्या छोट्या गोष्टींवरून ब्रेकअप होऊ शकते. त्यामुळे नातं टिकवायचे असेल तर पार्टनरला नेहमी भेटत राहा.

खूप वेळा फोन करणे :

पार्टनरला तेवढाच संपर्क साधा जितका नाते टिवविण्यासाठी गरजेचा आहे. जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त फोन किंवा मेसेज करून आपल्या पार्टनरच्या आयुष्यात डोकावत असाल हे ब्रेकअपचे कारण ठरू शकते. त्यामुळे जोडीदारासोबत मर्यादेतच संपर्क ठेवावा.

पार्टनरकडे व्यवस्थित लक्ष न देणे :

जेव्हा तुमच्या पार्टनरसोबत असूनही त्यांना अटेंशन देत नाही, पार्टनर सोबत असूनही फोनवर असतात आशा लोकांचे ब्रेकअप होण्याची शक्यता असते. पार्टनरसोबत असताना सोशल मिडिया चेक करणे आणि मग कॉलवर असणे आणि तुम्ही त्यांच्यासोबत सोबत असूनही सोबत नसता. असे वागल्यास नाते तुटू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: होमगार्ड तरुणीचा खून मैत्रिणीकडून,मृतदेह फेकण्यासाठी घेतली मुलाची मदत

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT