लाइफस्टाइल

मद्यापेक्षाही बदामामुळे यकृताचं होऊ शकते मोठे नुकसान, सदगुरूंनी सांगितली सेवनाची योग्य पद्धत

How To Eat Almonds: बदाम हे एक सुपरफूड आहे; ज्यामध्ये प्रथिने, फायबर, ओमेगा फॅटी अॅसिड यासारख्या पोषणतत्त्वांचा मोठा साठा असतो. पण चुकीच्या पद्धतीने बदामचे सेवन केल्यास यकृतावर दुष्परिणाम होऊ शकतात.

सकाळ डिजिटल टीम

सुकामेव्यामध्ये कित्येक प्रकारच्या जीवनसत्त्वे आणि खनिजांचा साठा असतो, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. सुकामेव्याचे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने सेवन केल्यास मेंदूही तीक्ष्ण होतो. म्हणून लहान मुलांसह प्रौढ मंडळी देखील बदामाचे सेवन करतात. पण चुकीच्या पद्धतीने बदाम खाल्ल्यास कर्करोग होण्याची शक्यता असते.  

सदगुरू जग्गी वासुदेव (sadhguru jaggi vasudev) यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ‘बदामामध्ये कॅन्सर आजार निर्माण करणारे तत्त्व असतात. ज्यामुळे आरोग्यास अपाय होऊ शकतात. म्हणूनच बदाम योग्यरित्या खाणे फार महत्त्वाचे आहे, जेणेकरून आरोग्यास केवळ फायदा मिळू शकेल. 

भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे

सदगुरूंनी सांगितले की बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. यानंतर त्यावरील साल सोलून बदामाचे सेवन करावे. यामुळे कर्करोगास कारणीभूत असणाऱ्या घटकांपासून मुक्ती मिळते.  

बदाम भिजत ठेवल्याने काय होते?

सदगुरू यांनी सांगितले की, ‘अशा प्रकारच्या सुकामेव्यांचा स्वरक्षणाचा आपला-आपला मार्ग असतो. जेव्हा तुम्ही बदाम भिजत ठेवता, तेव्हा त्यांना वाटत की बिया रूजवल्या जात आहेत. ज्यामुळे त्यांना अंकुर येतील आणि त्याचे रूपांतर वृक्षामध्ये होईल. 

यानंतर बदामामध्ये असणारे कार्सिनोजेनिक रसायन हे बदामाच्या सालीखाली जमा होते, ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे कीटक त्यांचा नाश करू शकत नाही.’

भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे 

  • शरीराला प्रोटीनचा पुरवठा होतो

  • वजन कमी होण्यास मदत मिळते

  • बुद्धी तीक्ष्ण होते

  • शरीराला ऊर्जा मिळते 

  • शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते

  • रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगळुरुतून जगभरात वाढवतायत 'ओळख मायबोलीची', देशविदेशातील हजारो विद्यार्थी शिकत आहेत मराठी

Rinku Singh Father Passed Away : क्रिकेटपटू रिंकू सिंगच्या वडिलांचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी, नोएडातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

आजचे राशिभविष्य - 27 फेब्रुवारी 2026

Paneer Fried Rice Recipe: उरलेला भात फेकू नका! फक्त 15 मिनिटांत बनवा रेस्टॉरंट-स्टाइल पनीर फ्राइड राइस

Panchang 27 February 2026: आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्राचे पठण आणि ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT