Winter Care Tips  esakal
लाइफस्टाइल

Winter Care Tips : हिवाळ्यातल्या सर्दी खोकल्यापासून आराम देतो हा शिरा, रेसिपी सेव्ह करून ठेवा

नाश्त्याला खाल्ला जाणारा शिरा तुम्हाला सर्दी पडशापासून आराम मिळवून देतो

Pooja Karande-Kadam

Winter Care Tips : हिवाळ्याला सुरूवात झाली म्हणजे धुके आणि कडाक्याची थंडी. या काळात लोक कोरड्या त्वचेपासून अनेक आजारांना सामोरे जातात. या काळात अगदी निरोगी व्यक्तीलाही कधी ना कधी सर्दी होतेच. लहान बालकानाही या काळात साथीचे आजार होतात.

आजार आला म्हणजे औषध पाणीही आलं. वृद्धांना आधीच इतर औषध सुरू असतात. तर लहानांना औषध खाण म्हणजे नको वाटत. त्यामुळं औषधांशिवाय आजार पळवण्यासाठी एक सोप्प उपाय आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

नाश्त्याला खाल्ला जाणारा शिरा तुम्हाला सर्दी पडशापासून आराम मिळवून देतो. फक्त तो शिरा रव्याचा नाही तर दुसऱ्याच पदार्थाचा आहे, तो कोणता आणि कसा करायचा हे पाहूया.

आज आम्ही तुम्हाला बेसनाच्या शिऱ्याबद्दल सांगत आहोत. हा शिरा खाल्ल्याने सर्दी-खोकल्यापासून त्वरित आराम मिळतो. शिवाय, हे इतके चविष्ट आहे की मुले ते अगदी आनंदाने खातात. चला जाणून घेऊया बेसन शिरा बनवण्याची रेसिपी.

साहित्य: एक चमचा तूप, दोन चमचे बेसन, एक ते दोन खजूर, चिमूटभर काळी मिरी पावडर, वेलचीपूड, चिमूटभर हळद, एक वाटी दूध.

कृती: तवा गरम करून त्यात एक चमचा तूप घाला. तूप गरम झाल्यावर दोन चमचे बेसन घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर चिमूटभर हळद घाला. काळी मिरी पावडर, वेलची पावडर. थोडावेळ परतून झाल्यावर त्यात चिरलेला खजूर घाला.

मिश्रण सतत ढवळत राहा. लागेल तसे दूध घाला जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. थोडावेळ शिजू द्या, जास्त पातळ करू नका. जाड म्हणजे ते चमच्याने उचलून खाता येईल. तुम्हाला हे खायचं नसेल तर पिऊही शकता. फक्त ते ग्लासमध्ये ओतून त्यात हवं तेवढं गरम दूध घालून मुलांना देऊ शकता. याचे सेवन केल्याने मुलांचा कफ,सर्दी छुमंतर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT