Hair Care Tips Esakal
लाइफस्टाइल

Winter Hair Care: थंडीत केसांची अशी 'घ्या' काळजी; घरीच तयार करा तेल

केसांची शाइन वाढवण्यासाठी लवेंडर आॅईलची मदत होते

सकाळ डिजिटल टीम

थंडीला (Winter)सुरुवात झाली की केसांच्या (Hair) समस्या वाढतात. या दिवसात केस कोरडे होतात. शिवाय कोंड्याची समस्या देखील होते. जास्त कोरडेपणा आणि सतत कोंडा यामुळे केसांची वाढ खुंटते. यासाठी वेळीच जर उपाय केले तर यापासून सुटका मिळवता येते. यासाठी या दिवसात तेलाचा अधिक वापर करा. किमान केस वाॅश करण्यापूर्वी तेलाची मालीश करून घ्या. बाजारात अनेक प्रकारची तेल उपलब्ध आहेत. मात्र, तुम्ही उत्तम पध्दतीचं तेल घरी बनवू शकता. ज्याचा फायदा तुम्हाला थंडीच्या दिवसात होऊ शकतो.

तेल बनवण्यासाठी साहित्य

कॅस्टर आॅईल, लवेंडर आॅईल ,मेहंदी आॅईल

असे बनवा तेल

कॅस्टर आॅईल, लवेंडर आॅईल ,मेहंदी आॅईल हे तेल एकत्र मिक्स करा. मिक्स झाल्यानंतर एका ड्राॅपर बाॅटलमध्ये एकत्र करा. केस वाॅश करण्याआधी हे तेल स्कॅल्पला लावून मसाज करा. वाॅश झाल्यानंतर पुन्हा एकदा एक थेंब हातावर घेऊन संपूर्ण केसाला लावून घ्या. तेल घेत असताना जास्त वापरू नका. केस तेलकट होतील.

कॅस्टर आॅईल, लवेंडर आॅईल ,मेहंदी आॅईल तेलाचे फायदे

कॅस्टर आॅईल : या तेलामुळे केसांची ग्रोथ वाढते. फोलिकल्सला पोषकतत्व मिळतात यामुळे ग्रोथ वाढण्यास मदत होते. हे तेल केसांना साॅफ्ट बनवतेच शिवाय केस गळतीपासून रोखते.

लवेंडर आॅईल : केसांची शाइन वाढवण्यासाठी लवेंडर आॅईलची मदत होते. केस सिल्की आणि सॉफ्ट होतात. यात असणारे अॅन्टी माइकोबियल गुणतत्व बॅक्टेरिया रोखण्यास मदत करतात.

मेहंदी ऑयल- ब्लड सक्युलेशनसाठी याचा फायदा होतो. यामुळे केसांची ग्रोथ वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT