Winter Skin Care  esakal
लाइफस्टाइल

Winter Skin Care : थंडीमध्ये मॉइश्‍चराइजर वापरूनही चेहरा दिसतोय खराब? ट्राय करा या टिप्स

थंडीत त्वचा खूप रुक्ष होते

सकाळ डिजिटल टीम

Winter Skin Care : थंडीच नेमकं काही सांगता येत नाहीये, एक दिवस खूप थंडी वाजते तर दुसऱ्या दिवशी काहीच नाही. अशात याचा सर्वात मोठा त्रास होतो तो शरीराला आणि त्वचेला. थंडीत त्वचा खूप रुक्ष होते, आपण तिला जपण्यासाठी मॉइश्‍चराइजर लावतो खरं पण त्याने तितकासा फरक पडत नाही.

खासकरून अंघोळीनंतर तर चेहरा खूप रुक्ष होतो. अशात नक्की काय करावं हा प्रश्न असतोच, कारण फक्त मॉइश्‍चराइजर लावून काहीही फायदा होत नाही, त्याने चेहरा तेलकट सुद्धा दिसू लागतो.

पण तुम्ही हे घरगुती उपाय करून तुमच्या चेहऱ्याला मॉइश्‍चराइज करू शकतात.

1. साय आणि लिंबाचा रस

सायीमध्ये दोन चमचे लिंबाचा रस टाकून चेहऱ्यावर लाइट मसाज करा. याने तुमच्या चेहऱ्याचा ड्रायनेस कमी होईल आणि लिंबात असलेल्या व्हिटामीन सीमुळे चेहऱ्याचा ग्लोसुद्धा वाढेल. जर तुम्हाला लिंबू वापरायचा नसेल तर तुम्ही संत्र किंवा एलोवेरा जेल सुद्धा वापरू शकतात.

2. मध आणि दूध

2 चमचे दूध वाटीत घ्या, त्यात मधाचे 5 ड्रॉप्स घाला, आणि ते चांगलं मिक्स करून कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा. 15-20 मिनिटात चेहरा धुन घ्या. टॉवेलने चेहरा हळूहळू पुसून टाका.

3. गुलाब जल आणि खोबरेल तेल

1 चमचा गुलाब पाण्यात खोबरेल तेलाचे 5 थेंब टाकून चेहऱ्यावर मसाज करा. हे एका प्रायमर सारखं सुद्धा काम करेल आणि चेहऱ्याचा ड्रायनेस दूर करेल.

4. तूप

स्कीन मॉइश्‍चराइज करण्यासाठीचा खूप जुना पर्याय म्हणजे तूप. थोडसं तूप चेहऱ्यावर लावल्याने खूप फायदा होतो. तुपात अॅंटी फंगल आणि अॅंटीसेप्टिक गुणधर्म असतात त्यामुळे आपला चेहरा मऊ होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंडमध्ये मंत्र्याचं निधन, छातीतली कळ नॉर्मल समजून सहन करत राहिले, २ तासांनी तीव्रता वाढली अन्...

Marathi News Live Updates : विद्यानंद बापटांना मारहाण करणाऱ्याचा चांदीचं कडं देऊन सत्कार करणार : संग्राम भंडारे

Nashik Accident: गोदाघाटावर थरार! गांधी तलावात पाच मुले बुडू लागली; चार जीवरक्षकांनी वाचविले चौघांचे प्राण, एकाचा मृत्यू

Manoj Jarange: ‘मुंबईला जाण्यापासून रोखण्याचे स्वप्न पाहू नका’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, सलाइन-पाणीही बंद

Nepal Floods: माणुसकीचे दर्शन! कुटुंबाबरोबरच पूरग्रस्तांच्या शोधासाठी प्रयत्न; आप्त हरवले...तरीही इतरांसाठी धडपड

SCROLL FOR NEXT