Winter Skin Care esakal
लाइफस्टाइल

Winter Skin Care : कोणतीही क्रिम नाही, घरी बनवलेलं शुद्ध तूप देईल Natural Soft Skin, हिवाळ्यात असा करा वापर

हिवाळ्यात व्हॅसलीन आणि क्रिम्सने चेहरा ऑईली होतो

Pooja Karande-Kadam

Winter Skin Care :

आजकाल चेहऱ्याच्या प्रत्येक समस्येवर अनेक क्रिम विकसीत झाल्या आहेत. अनेक प्रकारच्या क्रिम्समुळे चेहऱ्यावर ग्लो आणता येतो. हिवाळ्यात चेहरा फुटतो त्यावरही या क्रिम्स वापरून त्वचा सॉफ्ट बनवता येते. पण ते तात्पुरते होते, तुम्ही जोवर क्रिम्स लावता तेव्हा त्वचा मुलायम होते. पण एखादा दिवस जरी क्रिम लावायची विसरली तरी चेहरा रुक्ष होतो.

चेहरा रूक्ष होण्याच्या या समस्येवर देशी तूप लावता येते. तूप रोट्या, भाज्या आणि डाळींमध्ये घालून मोठ्या उत्साहाने खातात. लहानपणापासूनच घरातील सदस्य तूप खाण्याचा हट्ट करू लागतात. हेल्दी फॅट्स आणि पोषक तत्वांनी समृद्ध असलेले देशी तूप चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी देखील प्रभावी ठरते.

आयुर्वेदातही तुपाचे फायदे सांगितले आहेत. ओमेगा-३ फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन ए ने भरपूर देशी तूप चेहऱ्यावरील डाग कमी करते. चला जाणून घेऊया चेहऱ्यावर तूप वापरण्याची योग्य पद्धत, ज्यामुळे तुमचा चेहरा चमकेल.

देशी तूप चेहऱ्यावर कसे लावायचे?

हळद आणि देशी तुपाचा पॅक

डाग कमी करण्यासाठी हळद आणि बेसन तुपात मिसळून लावावे. यासाठी एका भांड्यात १ चमचा बेसन, १ चमचा तूप आणि १ चिमूट हळद एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे लावा. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

तूप आणि केशर

तूप आणि केशर एकत्र करून त्याचा पॅक लावल्याने चेहऱ्यावर चमक आणि घट्टपणा येतो. यासाठी अर्धा चमचा देशी तुपात केशराचे ४ ते ५ धागे मिसळा. नंतर ते चेहऱ्यावर आणि मानेला चोळून लावा. या पॅकमुळे चेहऱ्यावर चमक येते.

तूप आणि मसूर डाळ पॅक

मसूर डाळ आणि तूप एकत्र लावल्याने त्वचेवर चमक येते आणि डागही कमी होतात. यासाठी 3 चमचे मसूर 2 तास भिजत ठेवा आणि नंतर बारीक करा. मसूराच्या पेस्टमध्ये अर्धा चमचा तूप मिसळून पॅक तयार करा. हा पॅक 15 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर रगडताना स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. मसूद डाळ आणि तुपाचा हा पॅक मानेवर आणि हातावरही लावता येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mandangad Ghat Reopens : मुंबई, पुणे अन् महाडला जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! अखेर 'हा' महत्त्वाचा घाटमार्ग 4 दिवसांनंतर वाहतुकीसाठी खुला; मंडणगड-दापोलीचा संपर्कही पूर्ववत

Nagpur: नागपूर-बडनेरा रेल्वेमार्गावर ‘एबीएस सिस्टिम’; ऑटोमॅटिक सिग्नलिंगने वाढणार वेग; १७५ किमीचा मार्ग जानेवारीपर्यंत पूर्ण होणार

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

'मला त्या अदृश्य हातांची आठवण येतेय' किमोथेरिपी झाल्यानंतर मेधा मांजरेकरांची भावुक पोस्ट, म्हणाल्या...

Chhatrapati Sambhajinagar: म्हणे, मी त्याची पत्नी नाही; त्या खोलीत प्रवेशही नव्हता; बाबा फर्जन याच्या बंगल्यावरील कारवाई प्रकरणात अटकेतील महिलेचा एकाच दिवसात यू-टर्न

SCROLL FOR NEXT