Women Fashion  sakal
लाइफस्टाइल

Women Fashion : मान्सूनमध्ये तुमचा लूक करा अपग्रेड! 'हे' ट्रेंडी जंपसूट नक्की ट्राय करा

तुम्हाला बाजारात अनेक रंगांचे आणि डिझाइन्सचे जंपसूट मिळतील, पण तुम्ही काही नवीन ट्राय करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही या फ्लोरल प्रिंटेड जंपसूटला स्टाइल करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

पावसाळा आला की आपण बॅग, छत्री, रेनकोट ते कपड्यांपासून विविध खरेदीला लागतो. अशात जर फॅशनबद्दल बोलायचं झालं तर हवामानानुसार कपड्यांच्या निवडीला अनेकजण पसंती देतात. ही समस्या प्रत्येक ऋतूची असते. कारण या ऋतूत काय परिधान करावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे जे स्टायलिश दिसेल आणि आरामदायक देखील असेल. असे तुम्ही ऑनलाइन पर्याय शोधता, पण तरीही काय खरेदी करायचे ते समजत नाही.

तुम्ही जंपसूट ट्राय करू शकता. या प्रकारच्या आउटफिटमध्ये तुम्ही स्टायलिशही दिसता. तुम्हाला बाजारात अनेक रंगांचे आणि डिझाइन्सचे जंपसूट मिळतील, पण तुम्ही काही नवीन ट्राय करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही या फ्लोरल प्रिंटेड जंपसूटला स्टाइल करू शकता. या प्रकारचा जंपसूट पावसाळ्यात घालण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

पॉलिस्टर फ्लोरल प्रिंट जंपसूट

स्टायलिश लूकसाठी तुम्ही या प्रकारचे पॉलिस्टर फ्लोरल प्रिंट जंपसूट घालू शकता. हा जंपसूट व्ही-नेक डिझाइनमध्ये आहे. या प्रकारच्या जंपसूटसह तुम्ही हील्स घालू शकता आणि हा जंपसूट तुम्हाला ऑनलाइन आणि बाजारात दोन्ही ठिकाणी मिळेल. तुम्ही हा जंपसूट तुम्ही 1000 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.

रेयॉन प्रिंटेड फ्लोरल जंपसूट

या प्रकारचा रेयॉन प्रिंटेड फ्लोरल जंपसूट तुम्ही अनेक प्रसंगी घालू शकता. हा जंपसूट रेयॉन फॅब्रिकचा बनलेला आहे आणि परिधान करण्यास खूपच आरामदायक आहे. या आउटफिटमध्ये तुमचा लुक पूर्ण करण्यासाठी तुम्ही हील्स घालू शकता. तुम्ही हा आऊटफिट बाजारातून खरेदी करू शकता आणि हा जंपसूट तुम्ही 700 रुपयांपर्यंतच्या किमतीत ऑनलाइनही खरेदी करू शकता.

चंदेरी जंपसूट

या प्रकारचा चंदेरी जंपसूट तुम्ही कोणत्याही पार्टीत घालू शकता. या जंपसूटसह तुम्ही फ्लॅट्स घालू शकता आणि शूज देखील या आउटफिटसह स्टाईल करण्यासाठी योग्य पर्याय असू शकतात. तुम्हाला हा चंदेरी जंपसूट ऑनलाइन तसेच बाजारात देखील मिळेल, तुम्ही 1000 रुपयांपर्यंत या प्रकारचे चंदेरी जंपसूट खरेदी करू शकता.

चाकणकरांवर टीका, पक्षानं धाडली नोटीस; रूपाली ठोंबरे म्हणाल्या, वेळ खूपच कमी

Latest Marathi News Live Update : रूपाली पाटील ठोंबरे घेणार अजित पवारांची भेट

Leopard Attack : वन विभागाच्या दुर्लक्षामुळे निष्पाप तरुणाचा बळी? लोहशिंगवेत बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

Raisin Rate Hike : दिवाळीनंतर बेदाण्याला उच्चांकी दर, एका किलोला तब्बल ४१० रुपये मिळाल्याने शेतकऱ्यामध्ये समाधान

Railway Employees Protest: रेल्वे आंदोलन परवानगीशिवाय! अहवाल मागवला; कारवाई होणार

SCROLL FOR NEXT