beetroot  sakal
लाइफस्टाइल

Women's Day 2024 : महिलांनी तिशीनंतर रोज आहारात खावी 'ही' भाजी; प्रजनन क्षमता सुधारण्यास होईल मदत..

महिलांनी तिशीनंतर रोज आहारात खावी 'ही' भाजी..

Aishwarya Musale

आजकाल अनियमित जीवनशैली, ताणतणाव आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी या कारणांमुळे महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनाची समस्या दिसून येत आहे. त्यामुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होऊन त्यांना गर्भधारणा होण्यास त्रास होतो. अनेक स्त्रिया करिअर किंवा इतर कारणांमुळे उशिरा लग्न आणि प्रेग्नंसी प्लॅन करतात. त्याचा प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो.

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी तणावापासून दूर राहणे, निरोगी जीवनशैली असणे आणि योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे. येथे आम्ही तुम्हाला एका भाजीबद्दल सांगत आहोत, ज्याचा महिलांनी वयाच्या 30 वर्षांनंतर आहारात समावेश केलाच पाहिजे. यामुळे प्रजनन क्षमता वाढते आणि लोहाची पातळी देखील वाढते.

महिलांनी वयाच्या 30 नंतर बीटरूट खाणे आवश्यक आहे

तज्ज्ञांच्या मते, आहारात बीटरूटचा समावेश करणे प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी खूप चांगले आहे.

यामध्ये फोलेट मुबलक प्रमाणात आढळते. रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी हे अत्यंत महत्त्वाचे पोषक तत्व आहे.

बीटरूट खाल्ल्याने हेल्दी एगचे प्रोडक्शन वाढते.

बीटरूटमध्ये लोहही मुबलक प्रमाणात आढळते.

लोहाच्या कमतरतेमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या आहारात बीटरूटचा समावेश करून तुम्ही लोहाच्या कमतरतेवर मात करू शकता.

हे नैसर्गिकरित्या लोह पातळी वाढवते. त्यामुळे इनफर्टिलिटीचा धोका 30 टक्क्यांनी कमी होतो.

बीटरूटमध्ये केवळ फोलेटच नाही तर व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात आढळते.

हे अँटिऑक्सिडंट, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि तज्ञांच्या मते, प्रजनन क्षमता सुमारे 20 टक्क्यांनी सुधारू शकते.

बीटरूटमध्ये फायटोन्यूट्रिएंट्स आढळतात. हे यकृताचे कार्य सुलभ करतात आणि हार्मोन्सच्या डिटॉक्सिफिकेशनला प्रोत्साहन देतात.

हे गर्भाशयात उपस्थित असलेल्या काही समस्या देखील दुरुस्त करू शकते.

यामुळे बद्धकोष्ठता देखील दूर होते.

तुम्ही बीटरूटचा रस, सूप किंवा अगदी पराठे बनवू शकता. बीटरूटचा चीला देखील बनवू शकता.

तुमच्या आहारात बीटरूटचा अनेक प्रकारे समावेश करून तुम्ही निरोगी राहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election Conflict : पुण्यात निवडणुकीतील पराभवाचा राग; भाजप उमेदवाराच्या समर्थकांकडून कुटुंबाला हातपाय तोडण्याची धमकी!

Shukraditya Yog 2026: शुक्रादित्य योगामुळे 'या' 3 राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार; प्रेम वाढेल अन् करिअरमध्ये मिळेल मोठी झेप

Sumeet Wagh : सटाणा उपनगराध्यक्षपदी सुमित वाघ बिनविरोध; भाजपची पकड मजबूत

Latest Marathi News Live Update : सेना-मनसेच्या युतीत मनसे 'बिगेस्ट लुझर' - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

IPO Market : 20 जानेवारीला उघडणार मोठा IPO! GMP मध्ये वाढीचे संकेत; गुंतवणूक करण्याआधी वाचा डिटेल्स

SCROLL FOR NEXT