लाइफस्टाइल

Postpartum Belly Fat : प्रसूतीनंतर वाढलेलं वजन कमी करायचंय? मग या डिटॉक्स ड्रिंकचे रोज सेवन करा!

Aishwarya Musale

गरोदरपणात स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल होतात. जसजशी बाळाची वाढ होते, तसा पोटाचा घेर वाढतो व वजनही वाढू लागतं. प्रसूतीनंतर वाढलेलं वजन लगेचच कमी होत नाही. योग्य आहार आणि व्यायामाने वजन कमी केले जाऊ शकते. गर्भधारणेदरम्यान आणि नंतर महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. ज्याचा महिलांच्या वजनावरही परिणाम होतो.

बहुतेक महिलांना गर्भधारणेनंतर लगेचच फिट व्हायचे असते आणि पोटाची चरबी कशी कमी करायची याची त्यांना काळजी असते. प्रसूतीनंतर वाढलेले वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही डिटॉक्स वॉटर बनवू शकता. यामुळे तुम्हाला काही दिवसात फरक जाणवेल.

गर्भधारणेनंतर वजन कमी करण्यासाठी हे डिटॉक्स वॉटर प्या

  • प्रसूतीनंतर वजन कमी करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम अत्यंत आवश्यक आहे.

  • प्रसूतीनंतर व्यायाम केव्हा सुरू करावा आणि किती करावा याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

  • प्रसूतीनंतर वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुम्ही तज्ञांनी सुचवलेल्या या डिटॉक्स ड्रिंकची मदत घ्यावी.

  • ते बनवण्यासाठी काकडी, आले, पुदिना, लिंबू आणि पाणी वापरले जाते.

  • वजन कमी करण्यासाठी या सर्व गोष्टी चांगल्या मानल्या जातात.

अशी तयार करा वेट लॉस ड्रिंक

लागणारे साहित्य

  • काकडी - अर्धा

  • आले

  • लिंबू - अर्धा

  • पुदिन्याची पाने - मूठभर

  • पाणी - 1 ग्लास

बनवण्याची पद्धत

  • पाण्यात सर्वकाही मिसळा.

  • 1-2 तास तसेच ठेवा.

  • त्यानंतर हे वेट लॉस ड्रिंक प्यावे.

  • 15 दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT