womens day special  esakal
लाइफस्टाइल

Womens Day Special : तुस्सी ग्रेट हो पल्लवी! कोल्हापूरमध्ये शिक्षण, कतारमध्ये पेट्रोलियम इंजिनिअर अन् हॉलिवूडमधील स्टंटवुमन!

प्रियांचा चोप्रासाठी बॉडी डबल म्हणून स्टंटबाजी करणारी पल्लवी !

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूरी पोरी जगात भारी असतात म्हणूनच त्यांचा डंका जगभर गाजत असतो. केवळ मोठं बोलणं नाही तर अंगापिंडानही त्या दणकट असतात. कोल्हापूरच्या आई अंबाबाईसारखंच त्या कधी रणरागिणीचं रूप घेतात. तर, पिलांसाठी कधी हवळ्या मनाचा कोपरा उघडतात. अशीच एक महिला कोल्हापूरपासून थेट हॉलिवूडला जाऊन पोहोचली. तेही तिच्या रेसिंगच्या आवडीमूळे.  होय, कसे ते पाहुयात.

कोल्हापूरातल्या अंबाई डिफेन्स परिसरात पल्लवीचं घर आहे. तिने  होलिक्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. राजाराम महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तिने पुण्यातून पेट्रोलियम टेक्‍नॉलॉजीची मास्टर डिग्री मिळवली. शालेय जीवनातच पल्लवीला रेसिंगचा छंद लागला होता.

कोल्हापूरातच तज्ञांकडून तिने वाहन चालविण्याचे प्रशिक्षणही घेतले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पल्लवीने इराकमध्ये चार वर्षे पेट्रोलियम फिल्ड इंजिनिअर म्हणून काम केले. त्याचबरोबर दुबई, कतार, अमेरिका व भारतात पेट्रोलियम फिल्ड इंजिनिअर म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

फेवरेट रेसिंग कारसोबत पल्लवी

व्यवसायाने पेट्रोलियम इंजिनीअर असलेली कोल्हापुरातील पल्लवी यादव हॉलीवूडपटात चमकली आहे. जानेवारी २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘व्हाइट टायगर’ या आंतरराष्ट्रीय सिनेमात तिने अभिनेत्री प्रियंका चोप्रासाठी ‘बॉडी डबल’ म्हणून थरारक स्टंटबाजी केली आहे.

स्टंटबाईकवाली पल्लवी

अरविंद अडिगा यांच्या ‘द व्हाइट टायगर’ या बुकर विजेत्या कादंबरीवर आधारित हॉलीवूडपटात अभिनेत्री प्रियंका चोप्रासाठी डमी म्हणून काही स्टंट दृश्ये साकारली. दिल्लीजवळ एका स्टेडियमवर डिसेंबर २०२० मध्ये अडीच आठवडे  याचे चित्रीकरण केले. भारतीय स्टंट दिग्दर्शक सुनील रॉड्रीग्ज यांच्यासोबत हे थरारक स्टंट करण्याची संधीही तिला मिळाली. सिनेमाच्या श्रेयनामावलीतही पल्लवीचे नाव झळकले आहे. 

पल्लवी यांची झेप केवळ एवढ्याच चौकटीत नाही. तर, कार रेसिंग आणि पुरूषांची मक्तेदारी असलेल्या स्टंटबाजी क्षेत्रातही त्यांनी नाव कमावले आहे. रेसिंगसाठी फिजिकल फिटनेस फार महत्त्वाचा ठरतो. विशेषतः पुरुषांसोबत स्पर्धेत उतरायचे असेल तर कस लागतो. आपल्याकडे रेसिंगमध्ये उतरण्याचे मुलींचे प्रमाण अत्यल्प असल्याने पुरुषांसोबत स्पर्धेत उतरण्याखेरीज पर्याय राहत नाही, असे पल्लवी सांगते.

रेसिंगसाठी फिजिकल फिटनेस फार महत्त्वाचा ठरतो. विशेषतः पुरुषांसोबत स्पर्धेत उतरायचे असेल तर कस लागतो. आपल्याकडे रेसिंगमध्ये उतरण्याचे मुलींचे प्रमाण अत्यल्प असल्याने पुरुषांसोबत स्पर्धेत उतरण्याखेरीज पर्याय राहत नाही, असे पल्लवी सांगते. 

रेसिंगस्टार

पल्लवी परदेशात राहिली असली तरी तिला मराठी कल्चर आवडते. तिला नऊवारी साडी, ट्रॅडीशनल मराठी ड्रेस घालणे पसंत आहे. तीला भटकंतीचीही आवड आहे. पल्लवीच्या धाडसाचे कौतूक करावे तितके कमीच आहे. तिच्यासारखेच तूम्हीही पुरूषांनी ठरवून दिलेल्या क्षेत्राला करीअर न बनवता नव्या क्षेत्रात कामगिरी करण्याची संधी शोधा. आणि त्यात पल्लवीसारखीच उल्लेखनीय कामगिरी करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT