Women's Day 2024 esakal
लाइफस्टाइल

Women's Day 2024 : महिला दिनानिमित्त स्पेशल दिसायचे आहे? मग, 'या' स्टायलिश लूक्सपासून घ्या प्रेरणा

Women's Day 2024 : जगभरात दरवर्षी ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आता अवघ्या २ दिवसांवर हा महिला दिन येऊन ठेपला आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Women's Day 2024 : जगभरात दरवर्षी ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आता अवघ्या २ दिवसांवर हा दिवस येऊन ठेपला आहे. महिला दिनानिमित्त देशातील अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी महिलांचा सन्मान केला जातो, महिलांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित केले जाते.

महिला दिनाच्या निमित्ताने काही ठिकाणी महिला एकत्र येऊन स्वत:चे वेगळे प्लॅन्स बनवतात. काही जणी एकत्र येऊन पार्टी करतात, काही जणी फिरायला जातात तर काही जणी एखादा चित्रपट पहायला जातात. या दिवशी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी खास तयारी करतात. विविध प्रकारचे आऊटफीट्स परिधान करण्यावर महिला भर देतात.

आज आम्ही तुम्हाला अभिनेत्रींच्या अशाच काही स्टायलिश आऊटफिट्सबद्दल सांगणार आहोत. हे लूक तुम्ही रिक्रिएट करू शकता तसेच, तुम्ही हे आऊटफीट्स चांगल्या प्रकारे स्टाईल केले, तर तुमचा लूक एकदम परफेक्ट दिसेल. यात काही शंका नाही.

साडी लूक

साडी हा महिलांचा अतिशय प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. जर महिला दिनानिमित्त तुम्हाला काही पारंपारिक ट्राय करायचे असेल तर साडी त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. अभिनेत्री नयनताराच्या या साडी लूकपासून तुम्ही प्रेरणा घेऊ शकता.

नयनताराने लाईटवेट आणि प्लेन शेवाळी रंगाची साडी नेसली आहे. तिच्याप्रमाणे तुम्ही देखील लाईवेट आणि प्लेन साडी नेसू शकता. या प्लेन साडीवर नयनताराने मिनिमल ज्वेलरी कॅरी केली आहे. त्यामुळे, तिच्या लूकला वेगळाच ट्विस्ट मिळाला आहे.

तुम्ही देखील तिच्याप्रमाणे प्लेन रंगाची आणि लाईटवेट साडी ट्राय करू शकता. या प्रकारच्या साड्या आणि विविध रंगांचे पर्याय तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळतील. नयनताराप्रमाणे मिनिमल ज्वेलरी आणि मेकअप करून तुम्ही परफेक्ट लूक मिळवू शकता. तसेच, केसांची सुंदर हेअरस्टाईल देखील करू शकता.

पॅंटसूट लूक

महिला दिनानिमित्त जर तुम्हाला काही वेगळा असा फॉर्मल लूक ट्राय करायचा असेल, तर तुम्ही हा पॅंटसूट लूक नक्कीच ट्राय करू शकता. वेस्टर्न मात्र तितकाच प्रोफेशनल असणारा हा लूक कोणत्याही कार्यक्रमासाठी अगदी परफेक्ट आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने हा निळ्या रंगाचा पॅंटसूट परिधान केला आहे. तिने हा लूक फॉर्मल ठेवला असून, यावर तिने कोणत्याही प्रकारची ज्वेलरी कॅरी केली नाही. तिने केवळ कानातले घातले आहेत. शक्यतो फॉर्मल लूक ठेवण्यावर तिने भर दिला आहे.

तुम्ही देखील तिच्याप्रमाणे हा फॉर्मल लूक क्रिएट करू शकता. मार्केटमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे आणि विविध रंगांमधील पॅंटसूट सहज मिळतील. त्यावर मिनिमल मेकअप, मोकळे केस आणि मिनिमल ज्वेलरी कॅरी करायला अजिबात विसरू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT